Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Mumbai News : शेतकरी आंदोलनादरम्यान भारताकडून ट्वीटरला धमकी; सुप्रिया सुळे संतप्त; म्हणाल्या, हा तर लोकशाहीला धोका!

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Tuesday, 13 June 2023, 14:55

Mumbai News : मुंबई : शेतकरी आंदोलन भारतात सुरु होतं, तेव्हा आमच्याकडे अनेक मागण्या आल्या. या वेळी काही पत्रकार सरकारवर टीका करत होते. या मागण्या त्यांच्याविषयीच्याच होत्या. आम्हाला हा उघड इशाराच दिला गेला की आमचं ऐकलं नाही तर भारतात ट्विटर बंद करु. वास्तविक पाहता भारत ही ट्विटरसाठी मोठी बाजारपेठ आहे. याचा विचार करता आम्हाला जाणीवपूर्वक काही निर्णय घ्यावे लागले. तसे केले नसते तर आमची कार्यालये बंद करण्यात आली असती. कर्मचाऱ्यांवर छापेमारी करण्यात आली असती. हे भारतात घडलं आहे, जो एक लोकशाही देश आहे, असा दावा ट्विटरचे संस्थापक आणि माजी सीईओ जॅक डोर्सी यांनी केला. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षा सुप्रिया सुळे यांनी सरकारवर कडाडून टीका केली आहे. या संपूर्ण प्रकरणाची निःपक्षपाती पद्धतीने चौकशी होणे अतिशय गरजेचे आहे. ट्वीटरला खरोखरच धमक्या दिल्या गेल्या असतील तर त्या व्यक्तींवर कारवाई देखील व्हायला हवी, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली आहे. (India threatens Twitter amid farmers’ agitation; Supriya Sule angry; She said, this is a threat to democracy!)

हा तर देशातील लोकशाही व्यवस्थेला धोका..

जॅक डोर्सी यांच्या दाव्यामुळे संतप्त झालेल्या सुप्रिया सुळे म्हणाल्या की, दिल्लीच्या बॉर्डरवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु असताना भारत सरकारने काही विरोधी ट्वीटस् हटविण्यासाठी दबाव आणला होता, हा ट्वीटरचे तत्कालीन सीईओ जॅक डॉर्से यांचा खुलासा धक्कादायक आहे. (Mumbai News) सरकारवर टिका करणारा आवाज दाबण्यासाठी दबाव आणला होता तसेच सरकारचे ऐकले नाही तर भारतातील ट्वीटरचे कार्यालय देखील बंद करण्याच्या धमक्या दिल्याचे जॅक यांचे म्हणणे आहे. हे आरोप अतिशय गंभीर आहेत. देशातील लोकशाही व्यवस्थेला धोका तर आहेच, शिवाय अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा संकोच देखील आहे, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या.

ट्विटरचे संस्थापक आणि माजी सीईओ जॅक डोर्सी यांनी एका युट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत ही माहिती दिली. शक्तीशाली लोकांविषयी त्यांना प्रश्न विचारला गेला होता. त्यावेळी त्यांनी भारताचं नाव न घेता, या प्रश्नाचे उत्तर दिले. डोर्सी म्हणाले की, शेतकरी आंदोलनादरम्यानआम्हाला धमक्या देण्यात आल्या होत्या. (Mumbai News) जगभरातील अनेक शक्तीशाली लोक तुमच्याकडे येतात. विविध प्रकारच्या मागण्या करतात. मी उदाहरण देईन ते भारताचंच. भारतात जेव्हा शेतकरी आंदोलन सुरू होतं तेव्हा आमच्याकडे बऱ्याच मागण्या आल्या. काही पत्रकार हे सरकारवर टीका करत होते. त्यांच्याविषयीच्या या मागण्या होत्या.

 

डोर्सी म्हणाले की, आम्हाला इशाराच दिला गेला की आमचं ऐकलं नाही तर भारतात ट्विटर बंद करु. भारत ही ट्विटरसाठी मोठी बाजारपेठ आहे, त्यामुळे आम्हाला काही निर्णय घ्यावे लागले. तसं केलं नसतं तर आमची कार्यालयं बंद करण्यात आली असती, तसंच कर्मचाऱ्यांवर छापेमारी करण्यात आली असती. (Mumbai News) हे भारतात घडलं आहे. जो एक लोकशाही देश आहे, असंही डोर्सी यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाची निःपक्षपाती पद्धतीने चौकशी होणे अतिशय गरजेचे आहे. ट्वीटरला खरोखरच धमक्या दिल्या गेल्या असतील तर त्या व्यक्तींवर कारवाई देखील व्हायला हवी, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली आहे.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Mumbai News : जाहिरातीत देवेंद्रजी मागे पडले, एकनाथजी पुढे गेले… चंद्रशेखर बावनकुळे स्पष्टच बोलले…!

Mumbai News : ही बाळासाहेबांची शिवसेना नाही; ही तर मोदींची ‘शवसेना’; संजय राऊतांचा घणाघात!

Mumbai News : महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री राज ठाकरे? वाढदिवसानिमित्त लागले बॅनर्स; फक्त शुभेच्छांची भेट देण्याचे आवाहन!

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

प्रेम, कट आणि हत्या! केतन अग्रवाल प्रकरणात रोज नवे धक्कादायक खुलासे; पोलिसांनी घेतला ‘हा’ निर्णय

Friday, 3 July 2026, 8:17

Rain Alert Maharashtra: पुढील 72 तास धोक्याचे! मुंबई, पुण्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा

Friday, 3 July 2026, 7:47

Horoscope Today: आज ग्रहांची साथ कोणाला? 12 राशींसाठी जाणून घ्या दिवसाचे संपूर्ण भविष्य

Friday, 3 July 2026, 7:38

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

पुण्यातल्या कॉलेज तरुणींचा फ्री स्टाईल राडा! एकमेकींचे केस ओढले अन्… पहा व्हायरल Video

Thursday, 2 July 2026, 23:00
Next Post

Pimpri News : चिखलीत नोकरीचे आमिष दाखवून महिलेवर बलात्कार; दोघांना अटक

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.