Pune Crime : पुणे : वानवडी पोलीसांनी सिनस्टाईल पाठलाग करत वाहन चोरट्यांना अटक केली आहे. यावेळी पोलीसांनी चोरट्यांकडून 10 चोरीची वाहने जप्त केली आहे. चोरीच्या या वाहनांची किंमत सुमारे 4 लाख 65 हजार रुपये आहे. तिघांना पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. (Car thieves arrested in Cinestyle chase; Performance of Wanwadi Police)
दिनेश रघुनाथ शिंदे (28, रा. मातंग वस्ती, वैद्युवाडी, हडपसर, पुणे) आणि आकाश तुळशीराम ननवरे (25, रा. गोसावी वस्ती, हडपसर, पुणे) आणि बरकत अब्दुल शेख (45, रा. जैन टाऊनशिप, हांडेवाडी रोड, हडपसर, पुणे ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. (Pune Crime)
मिळालेल्या माहितीनुसार, वानवडी पोलिस ठाण्याती तपास पथकातील अधिकारी व पोलिस अंमलदार हे परिसरात पेट्रोलिंग करत असताना त्यांना रामटेकडी इंडस्ट्रियल परिसात रेल्वे अंडर बायपासजवळून दोघे संशयितरित्या आढळून आले. (Pune Crime) त्यावेळी पोलीसांनी त्यांना हटकले तेव्हा त्यांनी पळून जाण्याच पयत्न केला. यावेळी पोलीसांनी या चोरट्यांचा सिनेस्टाईल पाठलाग केला व या चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या.
10 वाहने जप्त
दरम्यान, पोलीसांनी चौकशी केली असता या चोरट्यांनी शहरात विविध पोलिस स्टेशनच्या हद्दीतून दुचाकी वाहने चोरल्याचे कबुल केले. यावेळी अनेक गुन्हे पोलीसांनी उघड केले. त्यामध्ये आरोपी बरकत अब्दुल शेखने वानवडी परिसरातून एक यामाहा दुचाकी चोरून नेली होती. त्यावेळी त्याने पल्सर गाडीचा उपयोग केला होता. (Pune Crime) सीसीटीव्ही फुटेजवरून पोलिसांनी त्याचा 24 तासाच्या आत शोध घेतला आणि त्याला अटक केली. त्याच्याकडून 2 वाहने जप्त करण्यात आली. वानवडी पोलिसांनी वाहन चोरी करणार्या तिघांना अटक करून त्यांच्याकडून 4 लाख 65 हजार रूपये किंमतीची 10 वाहने जप्त केली आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune Crime : पुर्ववैमनस्यातून दोघांवर तीक्ष्ण शस्त्राने वार; पुण्यातील महर्षीनगर येथील घटना
Pune Crime : पुणे स्टेशन परिसरात गांजा विकण्यासाठी आलेल्या दोन बिहाऱ्यांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या
Pune Crime : जावयाने सासू व त्यांच्या मित्राचे फोटो केले मार्फ; नग्न फोटो बनवून पाठवले नातेवाईकांना