Nagar News : कोतवाली, (नगर) : कर्ज फेडण्याकरिता धारदार कोयत्याचा धाक दाखवून तीन मित्रांनीच कटकारस्थान करून मित्राला लुटल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी कोतवाली पोलिसांनी तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे.
कोतवाली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (ता. १९) रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास सुरज सुनिल नायकवाडी (वय-१७, रा. शिंदेगल्ली, माळीवाडा, अहमदनगर) हा त्याचा मित्र – गणेश शंकर बहीरट याचे सोबत त्यांचे कडील अॅक्सेस मोपेड गाडीवरुन केडगाव येथुन गायकेमळा आगरकरमळ्या मार्गे अहमदनगर शहराकडे निघाला होता. (Nagar News)
यावेळी पाठीमागून एका शाईन मोटार सायकलवरुन दोन अनोळखी इसमांनी येवुन त्यांचे गाडीस धक्का मारुन अपघातात झालेले गाडीचे नुकसान भरुन देतो असे सांगितले. काही अंतरावर सोबत घेवुन जावुन त्यांचे गळ्याला धारदार कोयता लावुन फिर्यादीच्या हातातील सोन्याच्या दोन अंगठया बळजबरीने काढुन घेवुन तेथुन पळुन गेले. (Nagar News) याबाबतची तक्रार कोतवाली पोलीस ठाण्यात देण्यात आली होती.
कोतवाली पोलिसांची कामगिरी..
सदर गुन्हयाचा तपास करत असताना कोतवाली पोलीसांना एका गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, सदर गुन्हा हा फिर्यादीचे तीन मित्रांनी कटकारस्थान रचुन गुन्हा केला आहे. (Nagar News) त्यानुसार तीनही मित्रांना ताब्यात घेवुन त्यांचेकडे विचापूरस केली असता त्यांनी सदरचा गुन्हा कर्ज फेडण्याकरिता केल्याची कबुली दिली. सदर गुन्हयात फिर्यादी यांना वरील तिन्ही विधीसंषर्धीत बालकांचे सांगण्यावरुन धारदार शस्त्र कोयता लावून जबरीने लुटणारे आरोपी मंगेश कांबळे व बाबा कावळे रा. दोघेही केडगांव अहमदनगर असे निष्पन्न झालेले असुन त्यांचा शोध सुरु आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मनोज महाजन हे करीत आहेत.
सदरची कामगिरी पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, पोलीस उपनिरीक्षक मनोज कचरे, मनोज महाजन, पोलीस हवालदार तनवीर शेख, गणेश धोत्रे, योगेश भिंगारदिवे, अब्दुलकादर इनामदार, योगेश खामकर, संदिप थोरात, अमोल गाढे, याकुब सय्यद, सुजय हिवाळे, कैलास शिरसाठ, सोमनाथ राऊत, सागर मिसाळ, मोबाईल सेलचे नितीन शिंदे यांच्या पथकाने केली आहे.(Nagar News)
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :