Shikrapur Crime : शिक्रापूर, (पुणे) : तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथील ऊस तोड ठेकेदारास ऊस तोडणीसाठी कामगार पुरवितो असे म्हणून तब्बल चौदा लाख चाळीस हजारांना गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (The farmer was lied to by saying that the sugarcane cutting contractor provides labor for sugarcane cutting)
तळेगाव ढमढेरे येथील घटना
याबाबत संतोष विठोबा भुजबळ (वय ४०) रा. तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली. त्यानुसार ज्ञानेश्वर अंकुश चव्हाण याच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.(Shikrapur Crime)
मिळालेल्या माहितीनुसार, तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) येथील संतोष भुजबळ यांचा ऊस तोडणी कामगार घेऊन ऊस कारखान्याला पुरवण्याचा व्यवसाय असून ते ऊस तोडणीसाठी वेगवेगळ्या ठिकाणहून ऊस तोड कामगार आणत असतात त्यांच्या व्यवसायातून त्यांची ज्ञानेश्वर चव्हाण या व्यक्तीसोबत ओळख झाली. (Shikrapur Crime)
त्यांनतर चव्हाण यांनी ऊसतोड कामगारांना ॲडव्हान्स मध्ये पैसे देण्यासाठी काही पैशांची वेळोवेळी मागणी केली असता संतोष भुजबळ यांनी वेळोवेळी ज्ञानेश्वर चव्हाण यांना तब्बल 14 लाख 40 हजार रुपये रोख तसेच बँकेच्या माध्यमातून दिले. (Shikrapur Crime) मात्र त्यानंतर देखील कामगार येत नसल्याने चव्हाण यांच्याशी संपर्क साधला असता त्यांच्याशी संपर्क झाला. तसेच संतोष भुजबळ हे चव्हाणचे मूळ गावी गेले असता तेथे देखील तो भेटला नाही नंतर फोन देखील उचलले नाही. त्यामुळे आपली फसवणूक झाली असल्याचे भुजबळ यांच्या निदर्शनास आले.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Shikrapur | शिक्रापूर येथील मोक्का प्रकरणातील मुख्य आरोपीला जामीन..
Pargaon Shingve Accident News : पारगाव शिंगवे येथे पुलावरुन थेट घोडनदी पात्रात स्कॉर्पिओ कोसळली