दिनेश सोनवणे
दौंड : दौंड पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या रावणगाव पोलीस चौकीतील पोलिसाला तरुणाने मारहाण केल्याची धक्कादायक घटना नुकतीच उघडकीस आली आहे.
अमोल बाळू भिंगारदिवे (वय-३६ रा. रावणगाव ता. दौंड) अशी मारहाण करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस
हवालदार विनोद शेखलाल मिसाळ ( वय- ४०, रा .दौंड ) यांनी दौंड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी भिंगारदिवे याच्यावर दौंड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
दौंड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमोल भिंगारदिवे हा मंगळवारी (ता.०९) संध्याकाळी दहा वाजण्याच्या सुमारास रावणगाव अंकित पोलिस चौकी येथे येवून मोठ मोठ्याने आरडा ओरडा करत होता. यावेळी हवालदार विनोद मिसळ यांनी तू आरडा ओरड का करत आआहेस असे विचारले. असे विचारल्याचा आरोपीला राग आला व हवालदार मिसाळ यांच्या माझ्या अंगावर धावून येवून धक्काबुक्की शिवीगाळ केली. तसेच उजव्या डोळ्याजवळ हाताने जोराचा फटका मारून दुखापत केली आहे. त्यानुसार आरोपीवर शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा तपास दौंड पोलिस करत आहेत.