आपल्या आरोग्यासाठी प्रोटीन, व्हिटॅमिन यांसारख्या घटकांची गरज असते. आपल्याला हे घटक नैसर्गिकरित्या मिळवताही येतात. असे जरी असले तरी वजन कमी करण्यामध्ये Protein अर्थात प्रथिने महत्त्वाची भूमिका बजावतात. याच्या माध्यमातून वजन कमीही होऊ शकतं.
वजन कमी करायचे असल्यास प्रोटीनचे सेवन केले तर वजन झपाट्याने कमी होते. याशिवाय प्रोटीन फक्त स्नायूंसाठी नाहीतर संपूर्ण आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. प्रोटीन वजन कमी करण्यात मदत करू शकते. याने अनावश्यक भूक टाळता येऊ शकते. प्रथिनेयुक्त पदार्थांचे सेवन केल्याने तुम्हाला जास्त भूक लागत नाही. प्रोटीन आपली भूक नियंत्रित करतात. हे शरीरातील घेरलिनसारखे भूक नियंत्रित करणारे संप्रेरक कमी करते आणि पेप्टाइड YY (PYY) सारखे संप्रेरक वाढवते, ज्यामुळे भूक कमी होते.
तसेच जेव्हा तुम्ही जास्त प्रोटीन खाता, तेव्हा तुम्हाला जास्त काळ पोट भरलेले वाटते, जे तुम्हाला जास्त कॅलरी खाणे टाळण्यास मदत करू शकते. जेव्हा तुम्ही वजन कमी करण्यासाठी डाएट करता तेव्हा शरीरातील अतिरिक्त फॅट्स बर्न होतात. आहारात प्रोटीनचे योग्य प्रमाण असल्याने स्नायूंचे नुकसान होत नाही, ज्यामुळे शरीराची एकूण कॅलरीज बर्न करण्याची क्षमता कायम राहते.
कार्बोहायड्रेट्स आणि फॅट्सपेक्षा प्रोटीन तुम्हाला पूर्ण ठेवण्यामध्ये अधिक समाधानकारक असतात. म्हणजेच, जेव्हा तुम्ही प्रोटीनयुक्त अन्न खाता, तेव्हा तुम्हाला कार्बोहायड्रेट्स किंवा फॅट्सपासून मिळणाऱ्या कॅलरीज तेवढ्याच प्रमाणात खाल्ल्यानंतर पोट भरल्यासारखे वाटते.
या पदार्थातून मिळवता येतील प्रोटीन…
मांस, मासे, अंडी, कडधान्ये, चणे, दूध आणि काजू यांसारखे प्रोटीनचा स्त्रोत आहेत. तसेच सोया, टोफू आणि क्विनोआ यांसारख्या वनस्पतींमधून प्रथिनांचे चांगले स्त्रोत देखील मिळू शकतात. केवळ प्रोटीनच नाही तर कर्बोदके यांचाही आहारात समावेश करा. विशेषतः जर तुम्हाला तुमचे एकूण स्नायू सुधारायचे असतील किंवा वजन कमी करायचे असेल तर हे फायद्याचे ठरू शकते.