नवी दिल्ली : सध्या Firefox, Windows, Google Chrome यांसारखे अनेक इंटरनेट ब्राऊजर अस्तित्त्वात आहेत. त्यात आता Firefox आणि Windows युजर्ससाठी धोक्याची घंटा समोर आली आहे. रशिया-बेस्ड् हॅकिंग ग्रुप RomCom द्वारे या त्रुटींचा फायदा घेतला जात आहे. ही हॅकिंग मोहीम प्रामुख्याने युरोप आणि उत्तर अमेरिकेतील Firefox ब्राउझर युजर्स आणि Windows युजर्सना टार्गेट करत आहे.
RomCom हा सायबर क्राईम ग्रुप आहे जो रशियन सरकारसाठी सायबर हल्ले आणि डिजिटल घुसखोरी करण्यासाठी ओळखला जातो. गेल्या महिन्यात, जपानी तंत्रज्ञान कंपनी कॅसिओवरील रॅन्समवेअर हल्ल्याशी देखील या गटाचा संबंध होता. RomCom प्रामुख्याने युक्रेनला समर्थन देणाऱ्या संस्थांना टार्गेट करत आहे. RomCom ने या दोन झिरो-डे दोषांना एकत्र करून शून्य-क्लिक शोषण विकसित केले आहे.
शून्य-क्लिक शोषण तंत्रज्ञान हॅकर्सना युजर्सच्या डिव्हाइसवर कोणत्याही हालचालींशिवाय मालवेअर स्थापित करण्यास परवानगी देते. असे जरी असले तरी Firefox आणि Windows मध्ये अनेक फॉल्ट्स अर्थात त्रुटी असल्याने हे घडत असल्याचेही समोर आले आहे.