नवी दिल्ली : सध्या अनेक स्मार्टफोन्स लाँच केले जात आहेत. ग्राहकांच्या गरजेनुसार स्मार्टफोनमध्ये फीचर्सही दिले जात आहेत. पण, अनेक महागडे फोन्स मिळत असल्याने घ्यायचा कोणता हा प्रश्न पडतो. मात्र, प्रसिद्ध कंपनी Lava ने आपला नवा फोन लाँच केला आहे. यामध्ये 50MP कॅमेरासह 5000mAh बॅटरीही देण्यात आली आहे.
कंपनीने Lava Yuva 4 लाँच केला आहे. कंपनीचा हा एक एंट्री लेव्हल डिव्हाईस आहे. यामध्ये तुम्हाला HD+ डिस्प्ले मिळणार असून, जो 90Hz रिफ्रेश रेट सपोर्टसह येतो. फोन Unisoc T606 प्रोसेसरसह देण्यात आला आहे. हा फोन फक्त एकाच कॉन्फिगरेशनमध्ये येतो. त्याच्या 4GB रॅम + 64GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 6,999 रुपये आहे. यामध्ये ड्युअल सिम सपोर्ट उपलब्ध आहे. फोनमध्ये 50MP मुख्य लेन्स आहे, जो LED फ्लॅशसह येतो. कंपनीने 8MP सेल्फी कॅमेराही दिला आहे.
Lava Yuva 4 मध्ये 6.5-इंचाचा HD+ डिस्प्ले आहे, जो 90Hz रिफ्रेश रेट सपोर्टसह येतो. स्मार्टफोनमध्ये ऑक्टा-कोर Unisoc T606 प्रोसेसर देण्यात आला आहे. हा एक शक्तिशाली प्रोसेसर नसला तरी तुमच्या रेग्युलर वापरासाठी चांगला फायदेशीर ठरू शकतो.
स्मार्टफोन 4GB रॅम + 64GB स्टोरेजसह येतो. यामध्ये तुम्हाला 128GB स्टोरेज देखील मिळेल. मात्र, कंपनीने या व्हेरिएंटच्या किंमतीबाबत माहिती दिलेली नाही. या स्मार्टफोनची स्टोरेज मायक्रो एसडी कार्डच्या मदतीने 512GB पर्यंत वाढवता येते.