जनार्दन दांडगे
लोणी काळभोर, (पुणे) : जिल्ह्यासह संपुर्ण राज्याचे लक्ष लागुन राहिलेल्या हवेली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या “सभापती” पदी अपेक्षेप्रमाने लोणी काळभोर येथील “दिलीप काशिनाथ काळभोर” यांची तर “उपसभापती” पदी लोणी कंद येथील “रवींद्र नारायण कंद” यांची बिनविरोध निवड झाली आहे. (Big Breaking) दिलीप काळभोर यांची दुसऱ्यांदा सभापतीपदी निवड झाली आहे. तर रविंद्र कंद हे पहिल्यांदांचा निवडुन आले आहेत. (Big Breaking)
भारतीय जनता पक्षासह सर्वपक्षीय आघाडीचा बाजार समितीवर झेंडा.
सभापती व उपसभापती पदाच्या निवडीसाठी हवेली बाजार समितीच्या मार्केटयार्ड येथील कार्यालयात सर्व नवनिर्वाचित संचालक मंडळाची बैठक बोलविण्यात आली होती. जिल्हा उपनिबंधक (ग्रामिन) तथा निवडणुक निर्णय अधिकारी प्रकाश जगताप यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या निवडणुकीसाठी सभापतीपदासाठी व उपसभापदासाठी अनुक्रमे दिलीप काळभोर व रविंद्र कंद यां दोघांचे उमेदवारी अर्ज आल्याने, प्रकाश जगताप यांनी वरील दोघांच्या निवडीची घोषणा केली.
हवेली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या अठरा जागांच्यासाठी नुकतीच निवडणुक झाली होती. या झालेल्या भारतीय जनता पक्षाचे प्रदीपदादा कंद व पीडीसीसीचे संचालक विकासनाना दांगट यांच्या नेतृत्वाखालील “अण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडीने 13 जागा जिंकल्या होत्या. तर राष्ट्रवादी कॉग्रेसच्या “अण्णासाहेब मगर सहकार पॅनेल” ला अवघ्या 2 जागांच्यावर समाधान माणावे लागले होते. तर व्यापारी व हमाल-मापाडी गटातुन तीन उमेदवार स्वतंत्र निवडून होते.
दरम्यान सभापती व उपसभापतीपदाच्या निवडी जाहीर होताच, भारतीय जनता पक्षाचे वरीष्ठ नेते तथा पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे संचालक प्रदीपदादा कंद व पीडीसीसीचे संचालक विकासनाना दांगट, बाजार समितीचे वरीष्ठ संचालक रोहिदास उंद्रे, प्रशांत काळभोर, सुदर्शन चौधरी व त्यांच्या सहकाऱ्यांनी दिलीप काळभोर व रवींद्र कंद यांचे पुष्पहार घालुन अभिनंदन केले.
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या दहा महिण्यापुर्वी झालेल्या निवडणुकीत पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅकेच्या निवडणुकीत सर्वपक्षीय विकास दांगट यांनी जिल्हा परीषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप दादा कंद, बाजार समितीचे माजी अध्यक्ष दिलीप काळभोर, रोहिदास उंद्रे, प्रकाश जगताप, प्रशांत काळभोर यांना हाताशी धरुन विजय मिळवला होता.
दरम्यान, हाच धागा पकडत पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅकेच्या निवडणुकीमधील विकास दांगट यांचे भिडु पुन्हा एकदा एकत्र येत, सर्वपक्षीय “अण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडी पॅनेल” च्या माध्यमातुन बाजार समितीच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. समोर खु्दद अजित पवार यांच्यासह त्यांचे चार विद्यमान आमदार निवडणुकीसाठी झटत असतानाही, भारतीय जनता पक्षाचे प्रदीपदादा कंद व पीडीसीसीचे संचालक विकासनाना दांगट या दोघांनी राष्ट्रवादीला मोठी मात देण्यात यश मिळवले होते.
नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत विजयी झालेले नवनिर्वाचित संचालक पुढीलप्रमाणे-
सोसायटी मतदार संघातील “अण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडी पॅनेल” चे विजयी उमेदवार- रोहिदास दामोदर उंद्रे, दिलीप काशिनाथ काळभोर, प्रशांत दत्तात्रय काळभोर, राजाराम आबुराव कांचन, प्रकाश चंद्रकांत जगताप, नितीन पंढरीनाथ दांगट, दत्तात्रय लक्ष्मण पायगुडे, शशिकांत वामन गायकवाड व लक्ष्मण साधू केसकर
महिला विजयी उमेदवार- मनिषा प्रकाश हरपळे, सारिका मिलिंद हरगुडे
ग्रामपंचायत गट- सुदर्शन जयप्रकाश चौधरी, रवींद्र नारायणराव कंद.
राष्ट्रवादी कॉग्रेसचे विजयी उमेदवार पुढील प्रमाणे- रामकृष्ण हेमचंद्र सातव, आबासाहेब कोंडीबा आबनावे (ग्रामपंचायत गट)
व्यापारी मतदार संघ- गणेश सोपान घुले व अनिरुध्द अरुण भोसले.
हमाल-मापाडी मतदार संघ- संतोष नांगरे
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :