Saturday, July 25, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Big Breaking : हवेली बाजार समितीच्या सभापतीपदी दिलीप काशिनाथ काळभोर तर उपसभापतीपदी रवींद्र नारायण कंद यांची बिनविरोध निवड ..

जनार्दन दांडगेby जनार्दन दांडगे
Tuesday, 9 May 2023, 12:28

जनार्दन दांडगे     

लोणी काळभोर, (पुणे) : जिल्ह्यासह संपुर्ण राज्याचे लक्ष लागुन राहिलेल्या हवेली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या “सभापती” पदी अपेक्षेप्रमाने लोणी काळभोर येथील “दिलीप काशिनाथ काळभोर” यांची तर “उपसभापती” पदी लोणी कंद येथील “रवींद्र नारायण कंद” यांची बिनविरोध निवड झाली आहे.  (Big Breaking) दिलीप काळभोर यांची दुसऱ्यांदा सभापतीपदी निवड झाली आहे. तर रविंद्र कंद हे पहिल्यांदांचा निवडुन आले आहेत. (Big Breaking)

भारतीय जनता पक्षासह सर्वपक्षीय आघाडीचा बाजार समितीवर झेंडा.

सभापती व उपसभापती पदाच्या निवडीसाठी हवेली बाजार समितीच्या मार्केटयार्ड येथील कार्यालयात सर्व नवनिर्वाचित संचालक मंडळाची बैठक बोलविण्यात आली होती. जिल्हा उपनिबंधक (ग्रामिन) तथा निवडणुक निर्णय अधिकारी प्रकाश जगताप यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या निवडणुकीसाठी सभापतीपदासाठी व उपसभापदासाठी अनुक्रमे दिलीप काळभोर व रविंद्र कंद यां दोघांचे उमेदवारी अर्ज आल्याने, प्रकाश जगताप यांनी वरील दोघांच्या निवडीची घोषणा केली.

 

हवेली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या अठरा जागांच्यासाठी नुकतीच निवडणुक झाली होती. या झालेल्या भारतीय जनता पक्षाचे प्रदीपदादा कंद व पीडीसीसीचे संचालक विकासनाना दांगट यांच्या नेतृत्वाखालील “अण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडीने 13 जागा जिंकल्या होत्या. तर राष्ट्रवादी कॉग्रेसच्या “अण्णासाहेब मगर सहकार पॅनेल” ला अवघ्या 2 जागांच्यावर समाधान माणावे लागले होते. तर व्यापारी व हमाल-मापाडी गटातुन तीन उमेदवार स्वतंत्र निवडून होते.

दरम्यान सभापती व उपसभापतीपदाच्या निवडी जाहीर होताच, भारतीय जनता पक्षाचे वरीष्ठ नेते तथा पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे संचालक प्रदीपदादा कंद व पीडीसीसीचे संचालक विकासनाना दांगट, बाजार समितीचे वरीष्ठ संचालक रोहिदास उंद्रे, प्रशांत काळभोर, सुदर्शन चौधरी व त्यांच्या सहकाऱ्यांनी दिलीप काळभोर व रवींद्र कंद यांचे पुष्पहार घालुन अभिनंदन केले.

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या दहा महिण्यापुर्वी झालेल्या निवडणुकीत पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅकेच्या निवडणुकीत सर्वपक्षीय विकास दांगट यांनी जिल्हा परीषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप दादा कंद, बाजार समितीचे माजी अध्यक्ष दिलीप काळभोर, रोहिदास उंद्रे, प्रकाश जगताप, प्रशांत काळभोर यांना हाताशी धरुन विजय मिळवला होता.

दरम्यान, हाच धागा पकडत पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅकेच्या निवडणुकीमधील विकास दांगट यांचे भिडु पुन्हा एकदा एकत्र येत, सर्वपक्षीय “अण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडी पॅनेल” च्या माध्यमातुन बाजार समितीच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. समोर खु्दद अजित पवार यांच्यासह त्यांचे चार विद्यमान आमदार निवडणुकीसाठी झटत असतानाही, भारतीय जनता पक्षाचे प्रदीपदादा कंद व पीडीसीसीचे संचालक विकासनाना दांगट या दोघांनी राष्ट्रवादीला मोठी मात देण्यात यश मिळवले होते.

नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत विजयी झालेले नवनिर्वाचित संचालक पुढीलप्रमाणे-

सोसायटी मतदार संघातील “अण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडी पॅनेल” चे विजयी उमेदवार- रोहिदास दामोदर उंद्रे, दिलीप काशिनाथ काळभोर, प्रशांत दत्तात्रय काळभोर, राजाराम आबुराव कांचन, प्रकाश चंद्रकांत जगताप, नितीन पंढरीनाथ दांगट, दत्तात्रय लक्ष्मण पायगुडे, शशिकांत वामन गायकवाड व लक्ष्मण साधू केसकर

महिला विजयी उमेदवार- मनिषा प्रकाश हरपळे, सारिका मिलिंद हरगुडे

ग्रामपंचायत गट- सुदर्शन जयप्रकाश चौधरी, रवींद्र नारायणराव कंद.

राष्ट्रवादी कॉग्रेसचे विजयी उमेदवार पुढील प्रमाणे- रामकृष्ण हेमचंद्र सातव, आबासाहेब कोंडीबा आबनावे (ग्रामपंचायत गट)

व्यापारी मतदार संघ- गणेश सोपान घुले व अनिरुध्द अरुण भोसले.
हमाल-मापाडी मतदार संघ- संतोष नांगरे

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

 

Big Breaking-हवेली बाजार समितीच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा राष्ट्रवादीला मोठा “दे धक्का,” भारतीय जनता पक्षाचे नेते प्रदीपदादा कंद व पीडीसीसीचे संचालक विकासनाना दांगट यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलने सोसायटी मतदार संघातील अकराच्या अकरा जागा जिंकुन राष्ट्रवादीला दिला हॉईटवॉश..

Haveli : हवेली बाजार समिती निवडणुक-बाजार समितीच्या सत्तेच्या सारीपाटासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस व मित्रपक्ष पुरस्कृत पॅनेल समोर, भाजप व मित्रपक्ष यांच्या सर्वपक्षीय पॅनेलचे तगडे आव्हान, पॅनेलमधुन उमेदवारी न मिळाल्याने, पुर्व हवेलीमधील अनेक “युवा” नेते राष्ट्रवादीवर नाराज…

Breaking News | हवेली बाजार समितीच्या निवडणुकीत ग्रामपंचायत मतदार संघातील चारपैकी दोन जागांवर भारतीय जनता पक्षाचा झेंडा, राष्ट्रवादीला दोन जागा ; सुदर्शन चौधरी 258 मते घेऊन विजयी…

जनार्दन दांडगे

जनार्दन दांडगे

गेल्या २३ वर्षापासून पत्रकारीता क्षेत्राचा अनुभव आहे. दैनिक सकाळ च्या माध्यमातून गेली २१ वर्षे कार्यरत, नि:पक्षपातीपणे काम, जिल्ह्यातील गुन्ह्यांच्या बातम्यांकडे जास्त भर, ६ वर्षापूर्वी भाईचंद हिराचंद रायसोनी (BHR) या पतसंस्थेचा १६०० कोटी रुपयांचा घोटाळा उघडकीस आणण्यासाठी हातखंडा तर १४ वर्षांपूर्वी एका बिल्डरचा ४५० कोटी रुपयांचा बँकिंग घोटाळा उघडकीस आणला, नागरिकांच्या समस्या बातम्यांच्या माध्यमातून समाजासमोर मांडण्याचा प्रयत्न,जिल्ह्यातील बेकायदा वाळू, जुगार, मटका, दारू आणि अवैध धंदे यांच्यावर कारवाईची मागणी, प्रशासनाच्या माध्यमातून नागरिकांना योग्य न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न, राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण यांच्या लेखनात विशेष प्राविण्य. सध्या पुणे प्राईम न्यूज चे मुख्य संपादक म्हणून कार्यरत आहेत.

ताज्या बातम्या

नीट पेपरफुटीपाठोपाठ शिक्षणात आणखी एक महाघोटाळा! १९० कोटींच्या बनावट ‘शालार्थ आयडी’ प्रकरणी माजी शिक्षणाधिकाऱ्यांना अटक

Friday, 24 July 2026, 22:58

सोशल मीडियाची मैत्री पडली महागात! शिक्षिकेच्या घरातून १४ लाखांचा ऐवज लांबवून प्रियकर पसार

Friday, 24 July 2026, 22:23

पावसाचा जोर ओसरणार की संकट कायम? राज्यात ३ ठिकाणी ‘ऑरेंज’ तर ७ जिल्ह्यांत ‘यलो’ अलर्ट जारी!

Friday, 24 July 2026, 21:43

पेपरफुटी करणाऱ्यांना आता १० वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा अन् १० कोटींचा दंड! कॅबिनेटचा सर्वात मोठा निर्णय

Friday, 24 July 2026, 21:02

शिरूरमधील प्रकार! खरेदीच्या बहाण्याने सराफ दुकानात शिरल्या अन् चार महिलांनी हातचलाखीने दागिने लांबवीले….

Friday, 24 July 2026, 20:19

पत्नीचे उत्पन्न जास्त असेल तर पोटगीचा अधिकार नाही! मुंबई उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक आणि मोठा निर्णय

Friday, 24 July 2026, 19:36
Next Post

Accident | वल्लभनगर एस.टी बस आगारात दोन एसटी बसमध्ये चिरडून मॅकेनीक विभागातील महिला कर्मचाऱ्याचा मृत्यू ; पिंपरी पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.