(Chitra Wagh) मुंबई : राज्याच्या अर्थसंकल्पात महिलांना एसटीने अर्ध्या तिकीटात प्रवास करण्याची घोषणा करण्यात आली होती. त्यानुसार या घोषणाचा अधिकृत आदेश काल पारित करण्यात आला असून महिलांना कालपासून अर्ध्या तिकीटात प्रवासाला सुरुवात झाली आहे. ही शिंदे-फडणवीस सरकारची “महिला सन्मान योजना” म्हणून ओळखली जाणार आहे.
योजनेचा लाभ चित्रा वाघ यांनी घेतला…!
या योजनेचा लाभ भाजपच्या महिला नेत्या आणि प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी घेतला आहे. त्याबाबत त्यांनी ट्विटरवर अधिकृत माहिती दिली आहे. भाजपा महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी एसटी बसच्या प्रवासात तिकीट दरात 50 टक्के सवलतीचा लाभ घेतला. त्यांनी ठक्कर एसटी डेपो ते मालेगाव दरम्यानचा प्रवास केला. या संदर्भात त्यांनी ‘लालपरीची सवारी, महिला घेई भरारी…’ असं ट्विट करत माहिती दिली.
“लालपरीची सवारी, महिला घेई भरारी…फक्त बोलणारे नाही, तर जे बोलले ते करून दाखवणारे महाराष्ट्राचे नेतृत्व देवेंद्र गंगाधरराव फडणवीस. श्रींच्या पादूका पंढरपूरला घेऊन जाणाऱ्या या पवित्र लालपरीच्या प्रवासात माऊलींना 50% सवलत देण्याची घोषणा यंदाच्या बजेटमध्ये सन्माननीय अर्थमंत्री श्री. देवेंद्र फडणवीसजी यांनी केली आणि लागलीच त्याची पूर्तता देखील झाली. असे ट्विटमध्ये नमूद केले आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…!
Politics News : काँग्रेस केवळ घोषणा करणार पक्ष ; उदयनराजे भोसले
Politics News : राजकारणाचं युद्ध संपलय आता समाजकारणाचं युद्ध रवींद्र धंगेकर