वाघोली : येथील एका महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या तरुणीवर चोरीचा आळ घेऊन तिच्याच मित्र आणि मैत्रिणींनी तिचे कपडे उतरवून व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत ८० हजार रुपये लुटल्याची घटना घडली आहे. लेक्सिकॉन मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट असे महाविद्यालयाचे नाव असून १७ ऑक्टोबर रोजी ही घटना घडली आहे.
याप्रकरणी लोणीकंद पोलीस ठाण्यात तीन तरुणींसह पाच जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याप्रकरणी पिडीतेच्या आईने फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी ही हरियाणा राज्यातील मोडियाखेडा गावची रहिवासी आहे. वाघोली येथील लेक्सिकॉन मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटमध्ये ती शिक्षण घेत होती. आरोपी देखील त्याच इन्स्टिट्यूट मध्ये शिक्षण घेतात. एकाच महाविद्यालयात शिक्षण घेत असल्याने पीडित तरुणी आणि आरोपींपैकी दोन तरुणी या वाघोली येथील फ्लॅटमध्ये राहण्यासाठी होत्या. त्यांच्या रूममध्ये चोरी झाली होती. पीडित मुलीला घर मालकावर संशय आल्याने तिने रूम बदलली आणि दुसऱ्या मुलींसोबत राहण्यासाठी गेली.
दुसऱ्या रूममध्ये राहत असताना आरोपी त्या फ्लॅटमध्ये गेले आणि त्यांनी पीडित तरुणीला शिवीगाळ करत चोरी केल्याचा आरोप केला. लॅपटॉप आणि सोन्याची चैन तू चोरली असे बोलून एका खोलीत घेऊन जात तिचे कपडे काढून झडती घेतली.
तसेच याबद्दल कोणाला काही सांगितल्यास व्हिडिओ बनवून व्हायरल करण्याची व तिच्या विरोधात पोलिसात तक्रार देण्याची धमकी देऊन तिच्याकडून ८० हजार रुपये ऑनलाईन ट्रान्सफर करून घेतले.
दरम्यान, आणखी पैशाची मागणी करत आरोपी तरुण तरुणींनी तिला हाताने मारण्यास सुरुवात केली होती. पीडित तरुणीने आरडाओरडा केल्यानंतर आजूबाजूचे लोक त्या ठिकाणी आले आणि आणि त्यानंतर आरोपी पळून गेले. या सर्व प्रकरणाने घाबरलेली तरुणी आपल्या मूळ गावी गेली होती. तिथे गेल्यानंतर या तरुणीच्या आईने हरियाणा राज्यातील सिरसा पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.
सदरची घटना १७ ऑक्टोबरला वाघोलीत घडली. ही तक्रार लोणीकंद पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आली आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.रणी पिडीतेच्या आईने फिर्याद दिली आहे.