पुणे : राज्यासह पुण्यात आज गणरायाच्या विसर्जनाची तयारी सुरु आहे. भाविक जड अंतकरणाने बाप्पाला निरोप देणार आहेत. याच पार्श्वभूमीवर आज सकाळी पुण्यात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गणरायाची पुजा केली. तसेच त्यांनी देवाकडे साकडं सुद्धा घातलं आहे. राज्यासह पुण्यातील नागरिकांना शांततेत आणि आपली जबाबदारी पार पाडत विसर्जनात सहभागी व्हावं असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे.
यावेळी त्यांच्यासोबत राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार या देखील उपस्थित होत्या. यावेळी त्यांनी विविध माध्यमांशी संवाद साधला. यंदा त्यांनी बाप्पाकडे नेमकं काय मागितलं? या प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं की, आज अंनत चतुर्दशी आहे, आज सकाळी उत्साहपुर्ण वातावरणात कार्यक्रम पार पडला. जनतेच्या सर्व इच्छा पुर्ण होऊ देत, राज्यातील नागरिकांना सुखी, समृध्दी, आणि भरभराटी लाभो, अशी प्रार्थना केल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.
राज्यातील नागरिकांना वाटत अजित पवार यांनी मुख्यमंत्री व्हावं, तुम्ही गणरायाकडं अजितदादा मुख्यमंत्री व्हावे म्हणून साकडं घातलं का? या प्रश्वावर उत्तर देताना खासदार सुनेत्रा पवार म्हणाल्या, सकाळी अजित पवार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे, प्रत्येक कार्यकर्त्यांची इच्छा असते, त्यांचा नेता मोठा व्हावा, आपल्या नेत्याला मोठं पद मिळावं, प्रत्येक कार्यकर्त्याला हे वाटत असतं, त्यात कार्यकर्त्यांचं अजित पवारांवर खूप प्रेम आहे, कार्यकर्त्यांच्या मनातील इच्छा पुर्ण होवो, असं साकडं मी गणरायाच्या चरणी घातलं आहे, असंही सुनेत्रा पवार यांनी म्हटलं आहे.
मुख्यमंत्री पदाबाबत अजित पवार काय म्हणाले?
येत्या काळात तुम्ही मुख्यमंत्री व्हावं असं अनेकांना वाटतं आहे, यावर बोलताना अजित पवार म्हणाले की, सर्वांनाच आपापले नेते मुख्यमंत्री व्हावेत असं वाटतं असतं. त्यावर दादांना वाटतं का? या प्रश्नावर बोलताना अजित पवार म्हणाले, सर्वांना वाटतं म्हणजे त्यात दादा पण आले, त्यांच्या या उत्तरावर उपस्थितांमध्ये एकच हसू उमटलं.
आपला मुख्यमंत्री व्हावा असं सर्व..
आपला मुख्यमंत्री व्हावा असं सर्व राजकीय पक्षांना वाटत असतं, प्रत्येकाचं वेगवेगळ्या प्रकारचं मत असतं, पण सर्वांचीच इच्छा पुर्ण होते, अशातला भाग नाही. जागा एकच असते, त्याला तुम्हाला १४५चा आकडा पाहिजे, तर दुसरी गोष्टी मतदार राजाच्या हातात, कोणाला निवडणून द्यायचं. हे असल्यामुळं लोकशाही, संविधान, डॉ.बाबासाहेबांनी दिलेला मतदानाचा अधिकार, या बाबी महत्त्वाच्या आहेत. शेवटी सर्वांच्या बाबतीत चांगलं व्हावं, ही सर्वांचीच इच्छा असते. त्यासाठी प्रत्येक जण प्रयत्न करत असतात, असंही यावेळी अजित पवार म्हणाले.