बापू मुळीक
पुरंदर : नुकतंच संभाजी ब्रिगेडचे अधिवेशन पार पडले. त्या अधिवेशनाला खासदार शरद पवार आणि खासदार छत्रपती शाहू महाराज उपस्थित होते. ज्ञानेश महाराव पत्रकार यांनी प्रभू श्रीराम, वारकरी संप्रदाय आणि स्वामी समर्थ व हिंदु समाजातील महापुरुषांवर चिखलफेक केली. शेवटच्या अधिवेशनामध्ये हिंदू समाजाच्या भावना दुखावण्याच काम या ज्ञानेश महाराव यांनी केलेलं आहे.
हे वक्तव्य करत असताना शरद पवारांनी त्यांना थांबवण्याचा काम न करता त्यांना मूक समर्थन दिले. याच्या निषेधार्थ सकल हिंदू समाजाच्या वतीने राज्यभर निदर्शने करण्यात येत असून, पुरंदर-हवेली मधील सकल हिंदू समाजाच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले आहे.
या वेळी जालिंदर कामठे, श्रीकांत ताम्हाणे, संतोष जगताप, अजिंक्य टेकवडे, निलेश जगताप, मयूर जगताप, सोनू जगताप, शैलेंद्र ठकार, मंदार गिरमे, रणजित शिर्के, पांडुरंग देवकर, समीर भिसे, आनंद जगताप, महेश राऊत, दीपक जावळे, तेजस शिवरकर आदी मान्यवर उपस्थित होते.