पुणे : नगराध्यक्ष, सरपंच नाही तर राष्ट्रपती आणि मुख्यमंत्रीही थेट जनतेतूनच निवडा, असा उपरोधिक सल्ला दिले विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी. आज त्यांनी बारामती येथे पत्रकारांशी संवाद साधला. हे तर दोघांचे मंत्रिमंडळ असा त्यांनी उल्लेख करून मंत्रिमंडळ बैठक आणि निर्णय यांची खिल्ली उडवली. ते म्हणाले की दोघांच्या मंत्री मंडळाला अशा बाबतीत घाई झालेली दिसते.
अजित पवार म्हणाले की सरपंच व नगराध्यक्ष निवडीबाबत विधीमंडळात चर्चा करुन निर्णय घ्यायला हवा होता. प्रत्यक्षात तसे काही घडले नाही. इतकेच नव्हे तर कुठल्या आमदारांचे मत यात विचारातच घेतले गेले नाही, दोघांच्या मंत्रिमंडळाने निर्णय घेतले आहे. बहुमतावर सर्व गोष्टी करणाऱ्या सरकारमध्ये मंत्रीमंडळाचा विस्तार का होत नाही असा सवालही अजित पवार यांनी केला.
दरम्यान, पूरपरिस्थितीमुळे मंत्रिमंडळ विस्तार आणि पालकमंत्री यांची नेमणूक गरजेची आहे. इतकेच नव्हे तर पुरग्रस्तांना मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी मदत करावी असे आवाहनही पवार यांनी केले.