Friday, October 30, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

संकष्टी चतुर्थीला अष्टविनायक तीर्थक्षेत्र थेऊर येथे भक्तीमळा फुलला ; चिंतामणीच्या दर्शनासाठी भाविकांच्या पहाटेपासूनच रांगा…!

विशाल कदमby विशाल कदम
Saturday, 16 July 2022, 16:30

लोणी काळभोर, (पुणे) : अष्टविनायक तीर्थक्षेत्रापैकी प्रख्यात धार्मिक स्थळ असलेल्या श्री क्षेत्र थेऊर (ता. हवेली ) येथील चिंतामणी मंदिरात संकष्टी चतुर्थीनिमित्त शनिवारी (ता.१६ ) चिंतामणीच्या दर्शनासाठी हजारो भाविक दाखल झाले होते. सकाळपासून दर्शनासाठी भाविकांच्या लांब रांगा लागल्या होत्या. मंदिर परिसराला जणूकाही यात्रेचे स्वरूप आले होते.

मंदिर परिसरात गावठी भाज्या, फळे, काजूगर, कोकम, कंदमुळे व रानमेवा घेऊन अनेक विक्रेते बसले होते. देवळात येणारे भाविक आवर्जून ते खरेदी करत होते. मंदिर परिसरातील दुकाने व हॉटेल ग्राहकांनी गजबजले होते. परिसरातील हॉटेल, खेळण्याची व शोभिवंत वस्तुंची दुकाने, नारळ, हार, फुल व पापड मिरगुंड, कडधान्य विक्रेते, प्रसाद व पेढेवाले यांच्या दुकानावर मोठी गर्दी झाली. त्यामुळे मंदिर परिसरात मोठी वर्दळ पहायला मिळत होती.

चिंचवड देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त आनंद महाराज तांबे म्हणाले, मागील चार दिवसापासून दिवस रात्र होत असलेल्या पावसाने शुक्रवारी दिवसभर उघडीप दिल्याने भाविक मोठ्या संख्येने चिंतामणीच्या दर्शनासाठी दाखल झाले होते. पहाटे चार वाजण्याच्या सुमारास विद्याधर आगलावे यांच्या हस्ते ‘श्रीं’ ची पूजा करून सकाळी सहा वाजल्यापासून मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी खुले करण्यात आले.

संकष्टी चतुर्थीनिमित्त मंदिरात विविध प्रकारची फुले वापरून आकर्षक रांगोळी, फुलांची आरास, पायघड्या सावलीसाठी मंडप व्यवस्था तसेच भाविकांसाठी स्वच्छता ग्रहाची व्यवस्था करण्यात आली होती. दुपारी भाविकांना देवस्थानच्या वतीने उपवासाची खिचडीचे वाटप करण्यात आले.

लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांच्या मार्गदर्शनाखाली मंदिर परिसरात पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. तसेच थेऊर ग्रामपंचायतीतर्फे पार्किंगची व्यवस्था करण्यात आली होती. व्यवस्थापक मंगलमूर्ती पोफळे, मोरेश्वर पेंडसे यांनी मंदिर परिसरात सहकार्य केले. तर आनंद महाराज तांबे हे मंदिर परिसरात लक्ष देऊन होते.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुणेकरांनो पाण्याचा वापर जपून करा! पालिकेकडून १० हजार दंड आणि गुन्ह्याची तरतूद

Friday, 30 October 2026, 14:19

हडपसरमध्ये भरधाव पीएमपीचा कहर! बसस्थानकावर उभ्या महिलेला बसने उडवलं; प्रत्यक्षदर्शींच्या डोळ्यादेखत थरारक घटना!

Friday, 30 October 2026, 14:17

दादांच्या मृत्यूनंतर नऊ महिन्यांनी बारामती विमानतळाला 65 कोटींचा निधी!

Friday, 30 October 2026, 14:07

सारसबागेत उभ्या कारमध्ये लोणी काळभोरच्या तरुणाचा मृतदेह; दुर्गंधीमुळे धक्कादायक प्रकार उघड!

Friday, 30 October 2026, 13:52

तपासातील गंभीर त्रुटी भोवल्या! फुरसुंगी पोलीस ठाण्यातील महिला पोलीस उपनिरीक्षक निलंबित

Friday, 30 October 2026, 13:18

राजवडीत मातीचा ढिगारा कोसळला! २७ वर्षीय मजुराचा मृत्यू, एक जखमी; संरक्षण भिंतीच्या बांधकामावेळी दुर्घटना, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची घटनास्थळी भेट

Friday, 30 October 2026, 13:15
Next Post

राज्यात मंत्रिमंडळ विस्तार होणार २० जुलैला? पहिल्या टप्प्यात केवळ १० ते १२ मंत्री शपथ घेणार...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp