Friday, October 30, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

दादांच्या मृत्यूनंतर नऊ महिन्यांनी बारामती विमानतळाला 65 कोटींचा निधी!

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Friday, 30 October 2026, 14:07

डॉ. अशोक बालगुडे

बारामती : पाच जणांचे प्राण घेणाऱ्या विमान दुर्घटनेनंतर तब्बल नऊ महिन्यांनी बारामती विमानतळाच्या सुरक्षेचा आणि आधुनिकीकरणाचा प्रश्न मार्गी लागण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. विमानतळाच्या विकासासाठी पहिल्या टप्प्यातील 65 कोटी रुपयांच्या कामांना राज्य सरकारने गुरुवारी (29 ऑक्टोबर) मंजुरी दिली. धावपट्टीचे नूतनीकरण, हवाई वाहतूक नियंत्रण मनोरा, संरक्षक भिंत, अग्निशमन केंद्र आणि आपत्कालीन सुविधांची उभारणी या कामांचा त्यात समावेश आहे. मात्र, दुर्घटनेपूर्वीच व्हायला हवी असलेली ही कामे दुर्घटनेनंतरच का मार्गी लागली, हा प्रश्नही या मंजुरीमुळे ऐरणीवर आला आहे.

28 जानेवारी 2026 रोजी बारामती विमानतळावर विमान उतरत असताना झालेल्या भीषण दुर्घटनेत तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झाला. या घटनेने विमानतळावरील पायाभूत सुविधा आणि विमान वाहतुकीच्या सुरक्षिततेतील त्रुटी उघड केल्या. अपघाताच्या प्राथमिक तपास अहवालातही धावपट्टीची दुरवस्था, हवामानविषयक माहिती देणाऱ्या स्वतंत्र यंत्रणेचा अभाव आणि मर्यादित दिशादर्शक सुविधांसारख्या बाबी निदर्शनास आल्या होत्या. धावपट्टीचे शेवटचे नूतनीकरण मार्च 2016 मध्ये झाले होते. त्यानंतर तिची दुरुस्ती आणि देखभाल पुरेशा प्रमाणात झालेली नव्हती.

महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक दीपक कपूर यांनी 65 कोटींच्या पहिल्या टप्प्याला शासनाची मंजुरी मिळाल्याची माहिती दिली. या कामांसाठी सल्लागार नियुक्त करण्याची निविदा प्रक्रिया 30 ऑक्टोबरपासून सुरू करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

पहिल्या टप्प्यात धावपट्टीचे पुनःडांबरीकरण, धावपट्टीच्या दोन्ही टोकांना सुरक्षितता क्षेत्राची उभारणी, परिसराचे सपाटीकरण, संरक्षक भिंत आणि हवाई वाहतूक नियंत्रण (एटीसी) मनोरा उभारण्यात येणार आहे. याशिवाय तांत्रिक इमारत, अग्निशमन केंद्र, आपत्कालीन कक्ष आणि सीसीटीव्ही यंत्रणाही विकसित केली जाणार आहे.

मात्र, मनोरा उभारणे म्हणजे सुरक्षित विमानतळ नव्हे! हवाई वाहतूक नियंत्रणासाठी प्रशिक्षित आणि अधिकृत कर्मचारी, प्रभावी संदेशवहन व्यवस्था, आवश्यक दिशादर्शक यंत्रणा, हवामानविषयक माहिती आणि नियामक मंजुरी या बाबीही तितक्याच महत्त्वाच्या आहेत. केवळ बांधकामे करून विमानतळाची सुरक्षितता सुनिश्चित होणार नाही, असा तज्ज्ञांचा इशारा आहे.

बारामती विमानतळावर यापूर्वीही प्रशिक्षणार्थी विमानांच्या दुर्घटना घडल्या आहेत. 9 ऑगस्ट रोजी प्रशिक्षणार्थी विमान धावपट्टीवरून घसरल्याची घटना घडली होती. त्यामुळे हा प्रश्न केवळ एका दुर्घटनेपुरता मर्यादित नसून विमानतळाच्या दीर्घकालीन सुरक्षिततेशी संबंधित आहे.

बारामतीच्या विमानतळाचे आधुनिकीकरण ही स्वागतार्ह बाब असली, तरी मंजूर निधी प्रत्यक्ष कामात किती वेगाने उतरतो, कामांची गुणवत्ता कोण तपासणार आणि नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाच्या सुरक्षा निकषांची पूर्तता कधी होणार, याची उत्तरे महत्त्वाची आहेत. दुर्घटनेनंतर मिळालेली ही मंजुरी केवळ घोषणेपुरती न राहता सुरक्षित विमान वाहतुकीचा पाया ठरली पाहिजे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

PM किसानचा हप्ता आला! शेतकऱ्यांच्या खात्यात २ हजार रुपये जमा,एका क्लिकवर तपासा नाव

Friday, 30 October 2026, 14:35

पुणेकरांनो पाण्याचा वापर जपून करा! पालिकेकडून १० हजार दंड आणि गुन्ह्याची तरतूद

Friday, 30 October 2026, 14:19

हडपसरमध्ये भरधाव पीएमपीचा कहर! बसस्थानकावर उभ्या महिलेला बसने उडवलं; प्रत्यक्षदर्शींच्या डोळ्यादेखत थरारक घटना!

Friday, 30 October 2026, 14:17

दादांच्या मृत्यूनंतर नऊ महिन्यांनी बारामती विमानतळाला 65 कोटींचा निधी!

Friday, 30 October 2026, 14:07

सारसबागेत उभ्या कारमध्ये लोणी काळभोरच्या तरुणाचा मृतदेह; दुर्गंधीमुळे धक्कादायक प्रकार उघड!

Friday, 30 October 2026, 13:52

तपासातील गंभीर त्रुटी भोवल्या! फुरसुंगी पोलीस ठाण्यातील महिला पोलीस उपनिरीक्षक निलंबित

Friday, 30 October 2026, 13:18
Next Post

हडपसरमध्ये भरधाव पीएमपीचा कहर! बसस्थानकावर उभ्या महिलेला बसने उडवलं; प्रत्यक्षदर्शींच्या डोळ्यादेखत थरारक घटना!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp