Weather News : पुणे पावसाची खात्रीशीर माहिती देणारी यंत्रणा म्हणजे वेदर डॉप्लर रडार. हवामानाच्या अंदाजाबरोबरच अतिवृष्टीच्या पूर्वसूचनेसाठी वेदर डॉप्लर रडारची भूमिका महत्त्वपूर्ण ठरते. सध्या मुंबई आणि नागपूरमध्ये असे रडार बसविले असून, लवकरच पुण्यातही वेदर डॉप्लर रडार बसविण्यात येईल, अशी माहिती भारतीय हवामानशास्त्र संस्थेचे प्रमुख डॉ. के. एस. होसाळीकर यांनी दिली. यामुळे पाऊस, अतिवृष्टी, ढगफुटी, गारपीट या गोष्टींचा अंदाज आधीच कळू शकणार आहे.(Weather News)
पावसाची खात्रीशीर माहिती देणारी यंत्रणा म्हणजे वेदर डॉप्लर रडार.
स्थानिक हवामानाचा अंदाज अधिक अचूक आणि वेळेत वर्तविण्यासाठी आता नवीन तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. याचाच एक भाग म्हणून हवामानासंदर्भात पूर्वसूचना देण्यासाठी पुण्यात ‘वेदर डॉप्लर रडार’ बसविण्यात येणार आहेत. याबाबत बेलताना डॉ. होसाळीकर म्हणाले की, सध्या मुंबईमध्ये दोन आणि नागपूरमध्ये एक डॉप्लर रडार कार्यरत आहे.(Weather News) गोवा आणि तेलंगणातील रडारचाही महाराष्ट्राला फायदा होत आहे. राज्यात नव्याने चार वेदर डॉप्लर रडार बसविण्याची प्रक्रिया चालू आहे. त्यासाठी योग्य त्या जागेचा शोध घेण्यात येत आहे. पुण्यातही लवकरच असा रडार बसविण्यात येत असून, जागा शोधण्याचे काम चालू आहे. दिवसेंदिवस नैसर्गिक आपत्तीमध्ये वाढ होत आहे. हवामान बदलामुळे मॉन्सूनचे वर्तनही बदल असून, अतिवृष्टीच्या घटनाही वाढल्या आहे. या पार्श्वभूमीवर राज्याला रडारची मोठी गरज आ, असेही त्यांनी स्पष्ट केले.(Weather News)
कशी आहे वेदर डॉप्लर रडार यंत्रणा?
डॉप्लर रडार ही पावसाची खात्रीशीर माहिती देणारी आपत्कालीन यंत्रणा आहे. अचूक हवामान माहिती देण्यासाठी तिचा वापर जगभर सर्रासपणे केला जातो. डॉप्लर रडार विद्युत चुंबकीय लहरी ढगावर सोडते. ढगांकडून परतणाऱ्या लहरी ढगाची ‘एक्स रे’प्रमाणे इत्थंभूत माहिती आणतात. डॉप्लर रडार ढग सरकत असतानाही अचूक माहिती देते. डॉप्लर रडारच्या साहाय्याने पावसाची, ढगफुटीची, गारपिटीची माहिती सहा ते चार तास आधी मिळू शकते. या यंत्रणेद्वारे २५० किलोमीटरपर्यंतच्या परीघात पाऊस, गारपीट किंवा ढगफुटी कोठे कोठे होणार, हे किमान एकतास आधी १०० टक्के खात्रीपूर्वक सांगता येते.(Weather News)
देशाला हवामानाच्या अंदाजासाठी सुपर कॉम्प्युटर मिळणार आहे. भारताकडे लवकरच १८ पेटाफ्लॉप सुपर कॉम्प्युटर येणार असल्याची माहिती मिळत आहे. यामुळे हवामानाचा अचूक अंदाज वर्तवला जाणार आहे. मार्च २०२४ पासून भारत सुपर कॉम्प्युटरच्या मदतीने हवामानाचा अचूक अंदाज वर्तवणार आहे. हे सुपर कॉम्प्युटर पुण्यातत बसवले जाणार आहेत, त्याचा फायदा देशाला होणार आहे.