महाराष्ट्र: भारतीय हवामान विभागाने (IMD) पुढील काही दिवस पुण्यासह महाराष्ट्रात मुसळधार पाऊस आणि वादळाचा इशारा जारी केला आहे. आयएमडीने अंदाज वर्तवला आहे की, अरबी समुद्रावर कमी दाबाचा पट्टा विकसित होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे महाराष्ट्राच्या काही भागात मुसळधार पाऊस आणि गडगडाटासह वादळी वारे वाहणार आहे. हवामान विभागाने, वादळी वारे, विजांचा कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. अलिकडच्या काळात झालेली तापमान वाढीमुळे नागरिकांना उन्हाच्या झळा सहन कराव्या लागत होत्या. दरम्यान, पावसामुळे नागरिकांना काहीसा दिलासा मिळणार आहे.
अधिकाऱ्यांनी नागरिकांना त्यांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक ती खबरदारी घेण्याचा सल्ला दिला आहे. “वादळाच्या वेळी झाडाखाली किंवा मोकळ्या जागेत आश्रय घेण्याचे टाळण्याचे आवाहन करतो,” असे महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांसाठी आव्हान निर्माण करू शकतो. पावसामुळे पिकांचे नुकसान होऊ शकते.