Pune News : पुणे : राज्यात यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला. बळीराजाला परतीच्या पावसाची अपेक्षा असतानाच राज्यातील अनेक शहरांचे तापमान घसरले आहे. विशेष म्हणजे राज्यातील सर्वात ‘हॉट’ शहर म्हणून ओळख असलेल्या जळगाव शहराचे तापमान घसरले असून, येथे ११.४ अंश सेल्सिअस अशा सर्वांत कमी तापमानाची नोंद झाली आहे. महाबळेश्वरचे किमान तापमान १६.५ अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले. तर सर्वात जास्त तापमान रत्नागिरी शहराचे होते. रत्नागिरीत कमाल तापमान ३६.७ अंश सेल्सिअस होते. पुण्यातदेखील पहाटे वातावरणात गारवा जाणवत आहे, तर दुपारी उन्हाचे चटके बसत आहेत. पुणे शहराचे तापमान १४ अंशावर आले आहे. तापमानात घसरण होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
पहाटे गारवा, तर दुपारी उन्हाचे चटके
सध्या दिवसा उन्हाचे चटके आणि रात्री थंडी असे वातावरण अनेक शहरांमध्ये पहायला मिळत आहे. अनेक शहरांमध्ये रात्रीच्या वेळेस बोचरी थंडी पडत आहे. (Pune News) पहाटे चार ते सात वाजेपर्यंत वातावरणात गारवा जाणवू लागला आहे. बदलत्या वातावरणाचा परिणाम आरोग्यावर होत असून, साखीच्या आजाराच्या रूग्णसंख्येत वाढ होत आहे. नागरिकांनी स्वेटर, जॅकेट, कानटोप्या बाहेर काढल्या आहेत. पुढील चार दिवसांत पुण्यात गारठा वाढण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
पुण्यातदेखील पहाटे वातावरणात गारवा जाणवत आहे, तर दुपारी उन्हाचे चटके बसत आहेत. पुणे शहराचे तापमान १४ अंशावर आले आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : नकटी म्हणून हिणवल्याने सुनेचा-सासूवर चाकूहल्ला ; सासू गंभीर जखमी, पुण्यातील घटना..
Pune News : ‘जीएच रायसोनी’च्या समर्थ वाटाणे याने तलवारबाजी स्पर्धेत मिळवले कांस्यपदक
Pune News : मराठा आरक्षणासाठी; वृद्धापकाळात टोकाचे पाऊल..इंद्रायणी नदीत आढळला मृतदेह..!