पुणे प्राईम न्यूज डेस्क: रॉयल एन्फिल्ड नवीन आपली नवी बाइक बेअर ६५० लाँच करणार आहे. या बाईकची लोक खूप दिवसांपासून वाट पाहत होते. या नवीन मोटरसायकलमध्ये इंटरसेप्टर ६५० प्रमाणेच इंजिन आणि चेसिस असेल, परंतु सस्पेंशन आणि चाके वेगळी असतील. ही नवीन बाईक साठच्या दशकातील स्क्रबलरप्रमाणे डिझाइन करण्यात आली आहे.
यामध्ये ६४८ सीसी ऑइल कूल्ड आणि एअर कूल्ड पॅरलल ट्विन इंजिन असून, ६-स्पीड गिअर बॉक्सने ते सुसज्ज आहे. या बाईकच्या पुढील बाजूस १९ इंच स्पोक्ड व्हील आहेत, तर मागील बाजूस १७ इंच चाक वापरण्यात आले आहे. या बाईकला १८४ मिमीचा ग्राउंड क्लिअरन्स मिळेल. सीटची लांबी ८३० एमएम इतकी मोठी आहे. याचा हँडलबार रुंद देण्यात आला आहे. ही बाईक ड्युअल चॅनल एबीएसने सुसज्ज आहे. या बाईकमध्ये सी चार्जिंग पोर्टदेखील आहे. ही बाइक जागतिक कलर व्हेरियंटसह येणार आहे. पुढील आठवड्यात ही बाईक लाँच होण्याची शक्यता आहे.