नवी दिल्ली : सध्या फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॉट्सऍप यांसारख्या सोशल मीडियाचा वापर झपाट्याने वाढला आहे. फेसबुकचा वापर यापूर्वी खूप मोठ्या प्रमाणात केला जायचा. मात्र, इन्स्टाग्राममुळे त्याचा वापर काही प्रमाणात कमी झाला आहे. पण, आजही बरेच लोक फेसबुक वापरत आहेत.
फेसबुक वापरत असताना पासवर्ड लक्षात ठेवणं खूपच गरजेचे असते. त्याशिवाय फेसबुक पेज ओपन होत नाही. त्यामुळे पासवर्ड जवळ असायलाच हवा. पण हाच पासवर्ड आठवत नसेल तर चांगलीच अडचण होऊ शकते. पण फेसबुकचा विसरलेला पासवर्ड नवीन कसा बनवायचा हे अजूनही अनेकांना माहिती नसेल. तर जाणून घेऊया नवीन पासवर्ड बनवायचा कसा…
असा करा तुमचा पासवर्ड रिसेट…
- सर्वप्रथम तुम्हाला www.facebook.com वर जावे लागेल. यानंतर फेसबुक लॉगिन पेज ओपन करावे लागेल.
- त्यानंतर तुम्हाला तुमचा ई-मेल आयडी किंवा मोबाईल नंबर टाकावा लागेल. त्यानंतर Forget Password वर क्लिक करा.
- आता एक नवीन स्क्रीन उघडेल, ज्यामध्ये तुम्हाला तुमचा मेल आयडी किंवा तुमचा फोन नंबर टाकावा लागेल.
- आता तुम्हाला एका पेजवर पुनर्निर्देशित केले जाईल, ज्यामध्ये तुम्हाला तीन पर्याय मिळतील. यामध्ये Google खाते, ई-मेलद्वारे कोड पाठवा किंवा संदेशाद्वारे कोड पाठवा यांचा समावेश असेल.
- त्यानंतर तुम्ही कोणताही पर्याय निवडाल, त्याप्रमाणे तुम्हाला एक कोड दिला जाईल.
- नंतर स्क्रीनवर कोड टाकावा लागेल.
- एक नवीन पेज उघडेल ज्याद्वारे तुम्ही तुमचा पासवर्ड बदलू शकाल.