नवी दिल्ली : प्रसिद्ध कंपनी iQOO ने आत्तापर्यंत अनेक स्मार्टफोन लाँच केले आहेत. त्यात आता आणखी एक नवीन स्मार्टफोन लाँच केले जात आहेत. तरुणांना हवे असणारे फीचर्स या फोन्समध्ये दिले जात आहेत. कंपनीचे लक्ष्य हे तरुणपिढीच आहे. त्यादृष्टीने अनेक बदल केले जात आहेत. iQOO कंपनीकडून Z10 5G हा स्मार्टफोन 11 एप्रिल रोजी लाँच करणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
iQOO च्या या नव्या स्मार्टफोनमध्ये अनेक बेस्ट असे फीचर्स देण्यात आले आहेत. या स्मार्टफोनमध्ये 7300mAh च्या दमदार बॅटरी देण्यात आली आहे. या फोनच्या फीचर्सबाबत कंपनीकडून अधिकृत माहिती दिली गेली नसली तरी iQOO Z10 5G मध्ये 6.67-इंच क्वाड-वाईड AMOLED डिस्प्ले 2400 × 1080 पिक्सेल आणि 120Hz च्या रिफ्रेश रेटसह मिळू शकणार आहे. या डिस्प्लेची कमाल ब्राईटनेस 2000 nits पर्यंत असू शकते. हा फोन Qualcomm Snapdragon 7s Gen 3 चिपसेटने परिपूर्ण असा असणार आहे. या डिव्हाईसमध्ये 8GB/12GB रॅम आणि 128GB/256GB स्टोरेजचा पर्याय मिळू शकणार आहे.
iQOO Z10 5G ला 50MP Sony IMX882 सेन्सर (OIS सपोर्टसह) मिळणार आहे. आणखी 2MP कॅमेरा सेन्सर उपलब्ध होणार आहे. या iQOO फोनमध्ये 32MP सेल्फी कॅमेरा असणार आहे. फोनमध्ये 7300mAh बॅटरी असेल, जी 90W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करू शकते. हा स्मार्टफोन Android 15 वर आधारित नवीन Funtouch OS वर काम करणार आहे.