मुंबई : सध्या अनेक मोबाईल नेटवर्क कंपन्यांकडून आपल्या ग्राहकांसाठी दर्जेदार सुविधा देण्याचा प्रयत्न केला जातो. त्यात IPL पाहणाऱ्या युजर्ससाठी Jio ने एक नवीन प्लान आणला होता. आता हा प्लान जिओने बंद केला आहे. Jio ची मोफत JioHotstar ऑफर बंद करण्यात आली आहे.
JioHotstar 299 रुपये किंवा त्याहून अधिक प्रीपेड प्लॅन रिचार्ज करणाऱ्या युजर्ससाठी उपलब्ध होती. IPL (इंडियन प्रीमियर लीग) 2025 सुरू होण्यापूर्वी दोन आठवड्यांपूर्वी Jio ने ही ऑफर जाहीर केली होती. Jio प्रीपेड प्लॅनसह, युजर्संना आजपर्यंत IPL 2025 आणि JioHotstar च्या इतर सामग्री लायब्ररी पाहण्यासाठी विनामूल्य सेवा मिळत होती. ही ऑफर केवळ 31 मार्च 2025 पर्यंत जाहीर करण्यात आली होती आणि त्याची वैधता वाढवण्याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
या ऑफरसह, जर तुम्ही दररोज 2GB डेटा प्लॅन रिचार्ज केला तर तुम्हाला अमर्यादित 5G डेटा देखील मिळेल. तुम्हाला रिलायन्स जिओकडून मोफत JioHotstar चा लाभ घ्यायचा असेल, तर तुम्ही 949, 195 आणि 100 रुपयांचे प्लॅन निवडू शकता. हे तिन्ही प्लॅन 31 मार्च 2025 नंतरही उपलब्ध राहतील. 195 आणि 100 रुपयांचे प्लॅन डेटा व्हाउचरसह येतात. तर 949 रुपयांचा प्लॅन इतर सेवेसह मिळत आहे.