आजकाल जवळपास सर्वांकडे स्मार्टफोन आपल्याकडे पाहिला मिळतो. आधी स्मार्टफोन हा सहसा कॉलिंगसाठी वापरला जात असे. मात्र, सध्याच्या फोनमध्ये अनेक बेस्ट असे फीचर्स देण्यात येत आहेत. ज्यामुळे फोन स्मार्टफोन बनत आहे. आम्ही तुम्हाला स्मार्टफोनच्या एका फीचरबद्दल सांगणार आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही इतर इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस नियंत्रित करू शकता.
आयआर ब्लास्ट असे या फीचरचे नाव आहे. स्मार्टफोनमध्ये असणारा IR ब्लास्टर फोनच्या वरच्या भागात बसवला जातो. ते वापरणे अगदी सोपे आहे. हे टीव्ही आणि एसी रिमोट जसे काम करते त्याच प्रकारे कार्य करते. तो तुमचा फोन युनिव्हर्सल रिमोटमध्ये बदलतो. आयआर ब्लास्टरच्या मदतीने तुम्ही तुमचा मोबाईल फोन रिमोट कंट्रोल म्हणून वापरू शकता आणि तुमचा स्मार्ट टीव्ही, एसी, सेट टॉप बॉक्स आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणे ऑपरेट करू शकता.
सिंगल रिमोट यामुळे तुमचा फोन ‘युनिव्हर्सल रिमोट कंट्रोल’मध्ये बदलतो, त्यामुळे तुम्हाला वेगवेगळी उपकरणे ऑपरेट करण्यासाठी वेगळ्या रिमोटची आवश्यकता भासत नाही. या फीचरच्या मदतीने तुम्ही एकाच ठिकाणाहून अनेक उपकरणे सहजपणे नियंत्रित करू शकता. जसे की तुम्ही बसून टीव्ही चॅनल सहज बदलू शकता, आवाज वाढवू किंवा कमी करू शकता.