जळगाव: जळगावमधील नूतन मराठा महाविद्यालयाच्या आवारात सत्तू कोळी नावाच्या तरुणाने झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली असून घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. प्राथमिक माहितीनुसार, सत्तूचे त्याच परिसरात राहणाऱ्या एका मुलीशी प्रेमसंबंध होते. तथापि, काही दिवसांपूर्वीच या जोडप्याचे ब्रेकअप झाल्याचे वृत्त आहे, ज्यामुळे सत्तूने हा कठोर निर्णय घेतला असावा, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
सत्तूचे काही दिवसांपासून एका मुलीसोबत प्रेमसंबंध सुरू होते. काही दिवसांपूर्वी दोघांत ब्रेकअप झाले ज्यामुळे सत्तू तणावात होता. नात्यात दुरावा आला आणि दोघांचं ब्रेकअप झाले होते. आत्महत्येपूर्वी, सत्तूने सोशल मीडियावर त्याच्या माजी प्रेयसीसोबतचा एक फोटो पोस्ट केला, त्यानंतर त्याने हे टोकाचे पाऊल उचलले आहे. पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला आहे. मृत्यूचे नेमके कारण आणि त्यामागील परिस्थितीचा तपास केला जात आहे.