पाचगणी, (सातारा) : पाचगणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वेगवेगळ्या भागातून गहाळ झालेले 4 लाख रुपयांचे सुमारे 25 मोबाइल संच पाचगणी पोलिसांनी तक्रारदारांना परत मिळवून दिले आहेत. मूळ मालकांना मोबाईल परत मिळाल्याने तक्रारदारांनी आनंद व्यक्त केला आहे. अशी माहिती पाचगणी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाचगणी पोलीस ठाणे हद्दीतील रहीवासी व पर्यटकांचे मोबाईल गहाळ होण्याचे प्रमाण वाढलेले होते. त्या अनुषंगाने वरिष्ठांनी गहाळ झालेल्या मोबाईल फोनचा शोध घेण्याबाबत पाचगणी पोलिसांना सूचना दिल्या होत्या. वरीष्ठांनी दिलेल्या सुचना व आदेशान्वये गुन्हे प्रकटीकरण पथक, पोलीस अंमलदार यांनी पाचगणी पोलीस ठाण्यात गहाळ मोबाईलचा तपास हाती घेतला होता.
पाचगणी पोलिसांनी बुद्धी कौशल्याने व तांत्रिक माहीतीच्या आधारे 4 लाख रुपये किमतीचे वेगवेगळ्या कंपनीचे एकुण 25 मोबाईल फोनचा शोध सायबर तसेच गुन्हे प्रकटीकरण पथकाने घेतला. हे सर्व मोबाईल फोन सहायक पोलीस निरीक्षक दिलीप पवार व पथकाच्या हस्ते मूळ मालकांना समारंभपूर्वक परत दिले. आपला चोरीला गेलेला मोबाईल परत मिळाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त करून पाचगणी पोलिसांचे आभार मानले.
सदरची कामगीरी पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर, उपविभागिय पोलीस अधिकारी बाळासाहेब भालचीम यांच्या मार्गदर्शनाखाली पाचगणी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार, सायबर तसेच गुन्हे प्रकटीकरण विभागाचे पोलीस अंमलदार तानाजी शिंदे, पोलीस कॉन्स्टेबल उमेश लोखंडे व पोलीस कॉन्स्टेबल अमोल जगताप यांनी सहभाग घेतला होता.