Saturday, May 17, 2025
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

नगर: महागड्या दुचाकींची चोरी करणारी टोळी कोतवाली पोलिसांकडून जेरबंद

Yogesh Kangudeby Yogesh Kangude
Friday, 12 January 2024, 16:07
Ahmednagar Kotwali police arrested two wheeler thieves

नगर: महागड्या दुचाकी चोरी करणारी टोळी कोतवाली पोलिसांनी जेरबंद केली असून चोरलेल्या महागड्या दुचाकीही हस्तगत केल्या आहेत. महागड्या दुचाकी चोरून त्या शेतात, जंगलात किंवा डोंगर भागात लपवायच्या. काही दिवसानंतर त्या वाहनांचा सोक्षमोक्ष लावायचा, चोरीची पद्धत पोलिसांनाही चकवा देणारी होती. आता, मात्र कोतवाली पोलिसांनी टोळीला बेड्या ठोकल्या आहेत.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, सात डिसेंबर रोजी नगरच्या वैभव घोरपडे यांची पल्सर गाडी चोरीला गेल्याची फिर्याद दाखल करण्यात आली होती. गुन्ह्याचा तपास करत असताना पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, सदरील दुचाकी चोर हे सराईत असून ते विविध भागातून दुचाकी चोरतात. ते सराईत नेवासा भागात सापडतील, अशी माहिती देखील मिळाली. त्यानंतर पोलीस निरीक्षक यादव यांनी लागलीच गुन्हे शोध पथक तयार करून नेवासा या ठिकाणी रवाना केले.

या पथकाने तीन दिवस तपास करून त्या ठिकाणाहून अमित अशोक नगरे व धनाजी ज्ञानदेव कुचेकर (दोन्ही रा. नेवासा फाटा, ता. नेवासा) या दोघांना ताब्यात घेतले. त्यांना चोरी केलेल्या दुचाकीबाबत माहिती विचारली. मात्र, त्यांनी प्रथम उडवाउडवीची उत्तरे दिली. खोटी माहिती देऊन तपासाची दिशाभूल केली. त्यांच्याकडे सखोल चौकशी केली असता त्यांनी नगर शहरातून ३, संभाजीनगर येथून ३ अशा एकूण ६ मोटारसायकल चोरी केल्याची कबुली दिली. त्यामध्ये बजाज पल्सर एन.एस.१२५, आर-१५, पल्सर २२०, एच.एफ. डिलक्स २, डेस्टिनी १२५ अशा सहा दुचाकींचा समावेश आहे. ५ लाख ५० हजारांच्या या ६ दुचाकी कोतवाली पोलिसांनी जप्त केल्या आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभाग पोलीस अधिकारी हरीश खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, पोलीस अंमलदार तनवीर शेख, गणेश धोत्रे,योगेश भिंगारदिवे, शाहिद शेख, ए. पी. इनामदार, सलीम शेख, अतुल काजळे, अभय कदम, अमोल गाढे, संदीप थोरात, सुजय हिवाळे, सोमनाथ राऊत, वंदना काळे व दक्षिण मोबाईल सेलचे राहुल गुंडू आदींनी केली आहे.

Yogesh Kangude

Yogesh Kangude

ताज्या बातम्या

Breaking News : पुणे ग्रामीणच्या पोलिस अधीक्षकपदी संदीपसिंग गिल यांची नियुक्ती

Saturday, 17 May 2025, 13:32

उजनी धरण विषारी पाण्याच्या विळख्यात, धरणाकाठचे नागरिक आजाराने त्रस्त ; जलतज्ज्ञ राजेंद्र सिंहांचा दावा

Saturday, 17 May 2025, 13:18

पिंपरी महापालिकेची कारवाई ; तब्बल 36 अनाधिकृत बंगल्यावर बुलडोझर चालवला

Saturday, 17 May 2025, 12:32

दहशतवादाच्या विरोधातील भारताची भूमिका जागतिक पातळीवर मांडणाऱ्या शिष्टमंडळात खासदार सुप्रिया सुळेचां समावेश

Saturday, 17 May 2025, 11:55

शिरूरमध्ये युवक गांजासह अटक;एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल

Saturday, 17 May 2025, 11:06

आर्थिक फसवणुकीचा सायबर चोरट्याचा नवीन फंडा ; यवत पोलिसांची तक्रार घेण्यास टाळाटाळ

Saturday, 17 May 2025, 10:58
Next Post

मद्य-ड्रग्जच्या आहारी जाऊ नका, आई-बहिणींवरून अपशब्द वापरू नका; पंतप्रधान मोदींच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे

मुख्य संपादक : जनार्दन दांडगे

‭+91 9922232222‬
puneprimenews@gmail.com

Pune Prime News
Sunrise Complex, Loni Kalbhor (Station), Tal- Haveli Dist – Pune 412201

ट्रेंडिंग टॅग्स

" Bjp" " Maharashtra Politics" accident Accident News Ajit Pawar Assembly Election 2024 crime crime news crime pune daund news Devendra Fadnavis dist Eknath Shinde horoscope today indapur Indapur News india loni kalbhor Loni Kalbhor News maharashtra Maratha Reservation mumbai Mumbai News pimpari chinchwad pimpri chinchwad Pimpri News police political Political News politics Politics News pune pune city Pune Crime Pune Crime News Pune Dist pune news pune police satara sharad pawar shirur Shirur News SOLAPUR Sticky News uruli kanchan
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.