नागपूर: देशद्रोहात्मक मजकूर सोशल मीडियावर पोस्ट केल्याच्या आरोपाखाली नागपूर पोलिसांनी रजाज एम. शीबा सिद्दिक या पत्रकाराला अटक केली आहे. दोन्ही देशांनी एकमेकांवर हल्ले करत असून सध्या दोन्ही देशात तणावाची स्थिती आहे. या नाजूक परिस्थितीमध्ये पत्रकाराने सोशल मीडियावर देशद्रोहात्मक मजकूर पोस्ट केला आहे.
केरळमधील एडापल येथील रहिवासी सिद्दिकवर माओवादी गटांशी संबंध असल्याने हि कारवाई करण्यात आली आहे. तरुणाची मैत्रीण ईशा हिला हि ताब्यात घेण्यात आले असून सध्या तिची चौकशी करण्यात येत आहे. सिदीक यांचे माओवादी कनेक्शन असून ते विद्यार्थी चळवळीत सक्रिय असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिद्दिकला नागपूरमधील एका हॉटेलमध्ये अटक करण्यात आली जिथे तो त्याची मैत्रीण ईशाला भेटण्यासाठी आला होता. सिद्दिकच्या कथित माओवादी संबंधांबद्दल आणि इंस्टाग्रामवर आक्षेपार्ह पोस्टबद्दल माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सिद्दिकविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. पोलिस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.