अकोला: अकोल्यात आत्महत्येची एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. रविवारी 39 वर्षीय तलाठी शिलानंद तेलगोटे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याची माहिती समोर आली आहे. शिलानंद यांनी पत्नी प्रतिभा तेलगोटे यांनी दिलेल्या मानसिक छळाचा दोष देत आत्महत्या केल्याचे म्हंटले आहे. तेलगोटे यांच्या व्हॉट्सअॅप स्टेटसने आत्महत्येमागील कारण उघड केले असून मृत्यूपूर्वी पोस्ट केलेल्या व्हॉट्सअॅप स्टेटसमध्ये तेलगोटे यांनी सांगितले की, “त्यांच्या पत्नीचा सततचा मानसिक छळ आणि त्यांच्या मुलासमोर पत्नी नियमित करत असलेली शिवीगाळ यामुळे मला आत्महत्या करण्यास भाग पाडले. त्यांनी असेही नमूद केले की, त्यांच्या पत्नीचा भाऊ प्रवीण गायभोले यांना शेतीसाठी मी काही रक्कम दिली होती. सदर रक्कम मी तलाठीकडून काढली त्यामुळे व्याजासह पैसे देणे अपेक्षित होते. कारण माझ्या पगारामधून ती रक्कम कट होते” तसेच आत्महत्येपूर्वी जवळपास 5 दिवस जेवणही केले नसल्याचे त्यांनी म्हंटले आहे. .
पोलिसांचा तपास सुरू
पोलिसांनी तेलगोटे यांचा मृतदेह ताब्यात घेतला आहे आणि तो शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. पुढील तपास सुरू आहे आणि शवविच्छेदन अहवालाच्या आधारे पोलिस कारवाई करणार आहे.
तेलगोटे यांनी त्यांची शेवटची इच्छा व्यक्त केली की, त्यांच्या पत्नीला त्यांचा चेहरा पाहू देऊ नये, असे त्यांनी म्हंटले आहे. तेलगोटे यांनी एक सुसाईड नोटमध्ये, त्यांच्या मृत्यूसाठी त्यांची पत्नी जबाबदार असल्याचे म्हटले होते. तेलगोटे यांनी त्यांची मालमत्ता मुलाला देण्याचे मृत्यूपत्रात नमूद केले आहे.