जीवन सोनवणे
Shirwal News : खंडाळा : खंडाळा तालुक्यातील शिरवळ येथील बंद असलेल्या ब्राऊन पेपर टेक्नॉलॉजी शिर्के मिलला आग लागल्याची घटना मंगळवारी (ता. १०) रात्री दहा वाजण्याच्या सुमारास घडली. या कंपनीला गेल्या महिनाभरात आग लागण्याची ही तिसरी घटना आहे.
जाणूनबुजून आग लावल्याचा नागरिकांचा संशय
अनेक दिवसांपासून बंद असलेल्या शिर्के पेपर मिल या कंपनीला रात्रीच्या सुमारास पुन्हा एकदा अज्ञाताने आग लावली. मात्र, ही मिल अनेक दिवसांपासून बंद असल्याने, आगीत किती नुकसान झाले, याचा अंदाज लावता येत नाही, असे पोलिसांनी सांगितले. या महिन्यातील ही तिसरी घटना आहे. (Shirwal News) याच कंपनीत तिसऱ्यांदा आग लावली गेली. यामध्ये मिलमधील साहित्याचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आग आटोक्यात आणण्यासाठी रात्री उशिरापर्यंत प्रयत्न सुरु होते.
घटनास्थळी शिरवळ पोलीस, एशियन पेंट्सचे अग्निशामक दल व भोर नगरपालिकेचे अग्निशामक दल दाखल झाले. परंतु उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कंपनीला सील आहे. त्यामुळे मिलच्या आतील भागातील आग विझविण्यासाठी जाता आले नाही. (Shirwal News) कंपनीत आग लागल्याने परिसरात मोठ्या प्रमाणात धुराचे लोट दिसत होते. बघ्यांची गर्दी देखील झाली होती. त्यानुसार घटनेची नोंद शिरवळ पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आली आहे.
काही दिवसांपूर्वीच शिर्के कंपनीतील भंगार मालाला अज्ञातांनी आग लावली होती. यामुळे आजची आगही जाणूनबुजून लावण्यात आल्याचा संशय नागरिकांमधून व्यक्त होत आहे.(Shirwal News) दरम्यान, कंपनी आणि कामगारांमधील वादामुळे १०१२ पासून ही कंपनी बंद आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Shirwal News : शिरवळ हद्दीतील रेकॉर्डवरील गुन्हेगार सातारा, पुणे जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार
Satara News : सातारा जिल्ह्यात मद्य विक्रीस बंदी; गणेश चतुर्थीनिमित्त प्रशासनाचा निर्णय