सुरेश घाडगे
Paranda News : परंडा, (धाराशिव) : परंडा आगाराची परंडा – बार्शी – धाराशिव हि बस शनिवारी (ता. ०३) सकळी पाऊणे आठ वाजण्याच्या सुमारास पलटी झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात २० प्रवासी प्रवास करीत होते. परंडा शहरापासून जवळ असलेल्या परंडा – बार्शी रोडवरील सोनगिरी पुलाजवळील वळणावर हा अपघात झाला आहे. (ST bus accident near Parandya, 20 passengers injured; Help work started..!)
परंडा – बार्शी रोडवरील सोनगिरी पुलाजवळ झाला अपघात
मिळालेल्या माहितीनुसार, परंडा आगाराची परंडा – बार्शी – धाराशिव हि बस शनिवारी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास बसस्थानकातून सुटली होती.(Paranda News) परंडा शहरापासून ४ कि.मी. अंतरावर परंडा – बार्शी रोडवरील सोनगिरी पुलाजवळील वळणार ७ वाजून ४० मिनिटांनी बस पलटी झाली व हा अपघात झाल्याची माहिती प्रवासी नागरिकांनी दिली.
बार्शी बाजूकडून एक कंटेनर येत असताना समोरूनच एक जीप त्या कंटनेरला ओव्हरटेक करीत बसच्या अंगावर समोर आली असता बस चालकाने धडक टाळण्यासाठी (Paranda News) तथा बचाव करण्यासाठी बस रस्त्याच्या कडेला घेतली असता घसरून रस्त्याच्या बाजूला कोसळली.
दरम्यान, चालकाच्या प्रसंगावधानाने व बसचा वेग कमी असल्याने मोठी दुर्घटना टळली. घनटनेची माहिती मिळताच शेजारील लोकांनी प्रवाश्यांना बाहेर काढण्यास मदत केली. (Paranda News) तसेच जखमींवर परंडा उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.