लहू चव्हाण
Pachgani News : पाचगणी : रोटरी क्लबच्या संकल्पनेतून उभारलेल्या आगळ्यावेगळ्या पाचगणी रोटरी क्लब बस स्टाॅपमुळे पर्यटकांची गैरसोय दूर होणार आहे. तसेच शहराच्या वैभवात भर पडणार असल्याचे प्रतिपादन पाचगणी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश माने यांनी केले.
कंटेनरचा वापर करून उभारण्यात आला बस स्टाॅप
पाचगणी (ता. महाबळेश्वर) येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानासमोर उभारण्यात आलेल्या बस स्टाॅपच्या उद्घाटनप्रसंगी माने बोलत होते. (Pachgani News) या वेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता रंजित गवळी, रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३२ चे सहाय्यक प्रांतपाल मदन पोरे, पाचगणी रोटरी क्लबचे अध्यक्ष स्वप्नील परदेशी, सचिव नितीन कासुर्डे व रोटरीयन उपस्थित होते.
या वेळी बोलताना पाचगणी रोटरी क्लबचे अध्यक्ष स्वप्नील परदेशी म्हणाले की, या स्टाॅपवर ऊन, वारा, पाऊस झेलत खासगी बसची वाट पाहत अनेक पर्यटक थांबलेले असत. येथे बस स्टॉप असावा, अशी इच्छा पाचगणी रोटरी क्लबच्या सदस्यांची होती. (Pachgani News) यावर रोटरीच्या सदस्यांनी एकत्र येत आर्थिक हातभार लावत या बस स्थानकाची निर्मिती केल्याने एक वेगळा आनंद वाटतो. कंटेनरचा वापर करून उभारण्यात आलेल्या या बस स्टॉपमधील छत देखील घरातील हॉलप्रमाणे बनविण्यात आले आहे. बस स्टॉपवर नजर ठेवण्यासाठी दोन सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आल्याची माहिती रोटरीयन राजेंद्र पार्टे यांनी दिली.
या वेळी सहाय्यक प्रांतपाल मदन पोरे यांनी रोटरीच्या कार्याबद्दल मनोगत व्यक्त केले. आपल्या आधुनिक कलेतून कंटेनरला बस स्थानकाचा आकार देणाऱ्या रोटरीयन आर्किटेक्ट, डिझाईनर राजेंद्र भगत यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. (Pachgani News) आभार रोटरीयन सुनील कांबळे यांनी मानले.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pachgani News : पाचगणी पोलिस ठाण्याला सर्वोत्कृष्ट दोषसिद्धी पुरस्कार
Pachgani News : ई- केवायसी प्रकिया पूर्ण करण्याचे पाचगणी नगरपरिषदेचे आवाहन
Pachgani News : पाचगणीतील शिवाजी चौकावर ‘तिसऱ्या डोळ्या’ची नजर; पोलिसांना मदत होणार