Saturday, May 17, 2025
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

गोदावरी खोऱ्यात येणार एक टीएमसी पाणी ! वैतरणा-मुकणे प्रवाही वळण योजना प्रगतिपथावर

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Monday, 28 April 2025, 20:02
one tmc water in godavari khore soon

नाशिक: स्थानिकांच्या विरोधामुळे चार वर्षांपासून रखडलेल्या वैतरणा-मुकणे धरणांना संलग्न करणाऱ्या प्रवाही वळण योजनेच्या कामास अखेर गती मिळाली आहे. यंदाच्या पावसाळ्यात ऊर्ध्व वैतरणाच्या सांडव्यावरून समुद्राला वाहून जाणारे एक टीएमसी पाणी तुटीच्या गोदावरी खोऱ्यात वळविण्याचा प्रयत्न आहे. प्रवाही वळण योजनेसाठी १५.५ टीएमसी पाणी साठवणुकीच्या दृष्टीने पायाभूत सुविधा उभारणी होत आहे.

इगतपुरी तालुक्यातील या योजनेसाठी सुमारे १०८ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. २०२१ मध्ये या योजनेला मान्यता मिळाली होती. परंतु, स्थानिकांच्या विरोधामुळे हे काम रखडले. स्थानिक लोकप्रतिनिधींच्या मध्यस्थीनंतर त्यास सुरुवात होऊ शकल्याचे पाटबंधारे विभागाकडून सांगितले जाते. सद्यस्थितीत या योजनेचे काम २० टक्के झाले आहे. ऊर्ध्व वैतरणा धरण सह्याद्रीच्या माथ्यावर आहे. त्याचा सांडवा पश्चिमेकडे आहे. पावसात अतिरिक्त पाणी पश्चिम वाहिनी नद्यांमधून अरबी समुद्रात वाहून जाते, प्रवाही वळण योजनेतून हे पाणी मुकणे धरणात आणले जाणार असून दोन दरवाजे बसवून दोन्ही धरणांच्या पाणी फुगवट्यााला जोडले जाणार आहे.

प्रारंभी हा प्रकल्प एक टीएमसी पाणी वळविण्यासाठी मंजूर झाला होता. नंतर २०२१ मध्ये राज्य सरकारने १६ टीएमसी पाणी वळविण्यासाठी मंजुरी दिली. ही योजना पूर्णत्वास गेल्यानंतर एक टीएमसी म्हणजे एक हजार दशलक्ष घनफूट पाणी तुटीच्या गोदावरी खोऱ्यात वापरण्यासाठी उपलब्ध होईल. याचा लाभ नाशिकसह मराठवाड्याालाही होणार आहे.

धरणाची क्षमता १२ टीएमसी

उर्ध्व वैतरणा धरणाची १२ टीएमसी क्षमता असून हे पाणी पूर्णपणे मुंबई महापालिकेला पिण्यासाठी दिले जाते. या धरणाच्या पश्चिमेला मुंबई महापालिका गारगाई आणि पिंजाळ ही स्वतःची धरणे बांधत आहे. त्या धरणाची कामे पूर्णत्वास गेल्यानंतर गोदावरी खोऱ्यात ऊर्ध्व वैतरणातील पाणी मिळू शकेल, असे पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

Breaking News : पुणे ग्रामीणच्या पोलिस अधीक्षकपदी संदीपसिंग गिल यांची नियुक्ती

Saturday, 17 May 2025, 13:32

उजनी धरण विषारी पाण्याच्या विळख्यात, धरणाकाठचे नागरिक आजाराने त्रस्त ; जलतज्ज्ञ राजेंद्र सिंहांचा दावा

Saturday, 17 May 2025, 13:18

पिंपरी महापालिकेची कारवाई ; तब्बल 36 अनाधिकृत बंगल्यावर बुलडोझर चालवला

Saturday, 17 May 2025, 12:32

दहशतवादाच्या विरोधातील भारताची भूमिका जागतिक पातळीवर मांडणाऱ्या शिष्टमंडळात खासदार सुप्रिया सुळेचां समावेश

Saturday, 17 May 2025, 11:55

शिरूरमध्ये युवक गांजासह अटक;एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल

Saturday, 17 May 2025, 11:06

आर्थिक फसवणुकीचा सायबर चोरट्याचा नवीन फंडा ; यवत पोलिसांची तक्रार घेण्यास टाळाटाळ

Saturday, 17 May 2025, 10:58
Next Post

जिल्हाभरात हळहळ..! लेक 'यूपीएससी' पास, आनंदात पेढे वाटत असताना वडिलांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

मुख्य संपादक : जनार्दन दांडगे

‭+91 9922232222‬
puneprimenews@gmail.com

Pune Prime News
Sunrise Complex, Loni Kalbhor (Station), Tal- Haveli Dist – Pune 412201

ट्रेंडिंग टॅग्स

" Bjp" " Maharashtra Politics" accident Accident News Ajit Pawar Assembly Election 2024 crime crime news crime pune daund news Devendra Fadnavis dist Eknath Shinde horoscope today indapur Indapur News india loni kalbhor Loni Kalbhor News maharashtra Maratha Reservation mumbai Mumbai News pimpari chinchwad pimpri chinchwad Pimpri News police political Political News politics Politics News pune pune city Pune Crime Pune Crime News Pune Dist pune news pune police satara sharad pawar shirur Shirur News SOLAPUR Sticky News uruli kanchan
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.