crime news : कोतवाली, (नगर) : खंडणी मागितल्याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रवासी वाहनचालकांना दमदाटी व धमकावून पैशांची मागणी केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरशाद सय्यद (रा. मुकुंदनगर अहमदनगर) व शिफान दारुवाला (रा. आलमगीर अहमदनगर) अशी खंडणी मागणाऱ्या दोन आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी वाहनचालक कृष्णा पळसकर यांनी फिर्याद दिली आहे.
पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘कृष्णा पळसकर (रा. पळशी औरंगाबाद) हे संभाजीनगर -औरंगाबाद-नगर अशी प्रवासी वाहतूक करून कुटुंबाची उपजीविका करतात. रविवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास औरंगाबादला जाण्यासाठी तिघेजण गाडीत बसवले होते.
यावेळी आरशाद व शिफान हे त्या ठिकाणी आले. व त्यांनी”‘तू इथे प्रवासी कसे काय भरले? तुला प्रती सीट ५० रु. द्यावे लागतील. यापुढेही गाडी चालवायची असेल तर पैसे द्यावेच लागतील?” असे म्हणत दमदाटी करत गाडी अडवून ठेवली. यावेळी पळसकर यांनी लगेच गाडीतून उतरून जवळच इम्पिरिअल चौकात पोलिसांची नाकाबंदी असलेल्या ठिकाणी जाऊन मदत मागितली. त्यानंतर पोलिसांनी दोघांना ताब्यात घेत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोतवाली पोलिसांचे आवाहन..
बेकायदेशीरपणे कोणीही कोणत्याही प्रकारे पैशांची मागणी करत असल्यास किंवा वरीलप्रमाणे प्रकार आढळून आल्यास कोतवाली पोलीस स्टेशन येथे तक्रार द्यावी, असे आवाहन पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्याकडून करण्यात आले आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव गणेश धोत्रे योगेश भिंगारदिवे अमोल गाडे देवा थोरात सतीश भांड आदींनी केली आहे.