Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

लोणी काळभोर येथील एचपीसीएल कंपनीच्या टँकर चालकांचा संप मागे; पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांचा पुढाकार

विशाल कदमby विशाल कदम
Monday, 1 January 2024, 20:28

लोणी काळभोर : लोणी काळभोर (ता. हवेली) येथील हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीच्या टँकर चालकांनी सोमवार (ता.1) ते बुधवार (ता.३) असे तीन दिवसांचा संप पुकारला होता. मात्र लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांच्या हस्तक्षेपामुळे संप टळला असून कंपनीतून पेट्रोल डिझेलचा पुरवठा सुरळीत सुरु आहे.

सरकारने अपघाता विषयी कायदा निर्माण केला आहे. तो म्हणजे एखाद्या ड्रायव्हर चालकाकडून कोणाचा अपघात झाला तर, त्या अपघातासाठी चालकाला दहा वर्षाची शिक्षा आणि सात लाख दंड असा कायदा करण्यात आला आहे. या कायद्यामुळे पेट्रोल पुरवठा करणाऱ्या इंडियन ऑइल, एचपी सी एल, बीबीसीएल या तिन्ही कंपन्यांच्या टँकर चालकांनी संप पुकारला होता. या संपाला प्रतिसाद देण्यासाठी लोणी काळभोर (ता. हवेली) येथील एचपीसीएलच्या टँकर चालकांनीही मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला होता.

चालकांनी दिलेल्या माहितीनुसार, कायदे करणे अतिशय चुकीचे मानले गेले आहे त्यामुळे असले कायदे करून चालणार नाही. कोणताही अपघात हा जाणीवपूर्वक होत नसतो. त्यामुळे आम्ही या कायद्याच्या विरोधात आहोत. या कायदा विरोधात आम्ही तीन दिवस संप करणार आहोत, असे टँकर ड्रायव्हरने सांगितले.

 

या संपाची माहिती मिळताच, लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण त्वरित पोलिसांचा फौजफाटा घेऊन एचपीसीएल कंपनीत दाखल झाले. शशिकांत चव्हाण यांनी चालकांची समजूत काढून मध्यस्ती केली. हा नियम जो आहे. तो केवळ टँकर चालकांच नाही. तर सर्व चालकांना असणार आहे. या नियमाची अजून अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे सर्व सामान्य नागरिकांना वेठीस धरून नये,असे सांगितले. त्यानंतर चालकांनी संप मागे घेतला. संप घेतल्यानंतर एचपीसीएल कंपनीतून पुन्हा पेट्रोल डिझेलचा पुरवठा सुरळीत सुरु झाला.

यावेळी सहायक पोलीस आयुक्त अश्विनी राऊत, बीपीसीएलचे प्रबंधक दिपायण रॉय, इंडियन ऑइलचे प्रबंधक सुभाष रक्षित, एचपीसीएलचे प्रबंधक अखिल पांडे, पुणे पेट्रोल डीझेल असोसिएशनचे अध्यक्ष ध्रुव रूपरेल, पोलीस उपनिरीक्षक अमित गोरे, पोलीस अंमलदार रामदास मेमाणे व त्यांचे सहकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दरम्यान, एकंदरीत सर्वत्र राज्यांमध्ये ही खबर मोठ्या प्रमाणात पसरली आहे.  मात्र पेट्रोल पंप बंद राहणार नाहीत. अशी माहिती पुढे येत आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरू नये. 

टँकर चालकांनी संप पुकारला होता. मात्र पोलिसांनी मध्यस्थी केल्यामुळे चालकांनी संप मागे घेतला आहे. सध्या कंपनीतून पेट्रोल डिझेलचा पुरवठा सुरळीत सुरु आहे. त्यामुळे कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नये.

सुभाष रक्षित (प्रबंधक – इंडियन ऑइल लोणी काळभोर, ता. हवेली)   

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पिसोळीतील बेकायदा हुक्का पार्लर उद्ध्वस्त, 75 लाखांचा मुद्देमाल जप्त तर 12 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Friday, 3 July 2026, 19:26

दुधात भेसळ करणाऱ्यांची आता खैर नाही! तुकाराम मुंढे यांचे 8 नवे नियम लागू; दूध विक्रेत्यांचे धाबे दणाणले

Friday, 3 July 2026, 19:18

“हे बाळ मला नको आहे, गर्भपात करून टाक,” पतीसह चौघांविरुद्ध फुरसुंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

Friday, 3 July 2026, 19:00

‘शेअर मार्केटचा नावाखाली इंजिनिअरची १६ लाखांची फसवणूक, मांजरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Friday, 3 July 2026, 18:57

पुण्याच्या राजकारणात वादळ! खासदार अमोल कोल्हेंची ‘ती’ सोशल मीडिया पोस्ट व्हायरल, राजकारण कि सिनेमा?

Friday, 3 July 2026, 18:35

पुण्यात पुन्हा पोर्शे पॅटर्न! डॉक्टरच्या कारने चिमुकलीला चिरडले; निष्पाप बालिकेचा जीव गेला, पण पोलीस ‘आरोपी’च्या पाठीशी?

Friday, 3 July 2026, 18:13
Next Post
Pune News FIr registered against four people one arrested

Pune News: कत्तलीसाठी जनावरांची विक्री केल्याप्रकरणी चौघांवर गुन्हा; एकाला ठोकल्या बेड्या

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.