अक्षय टेमगिरे

शिरूर: शिरूर तालुक्यातील पिंपरी दुमाला येथे विजयादशमीनिमित्त रावण दहनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला मात्र यंदा दुष्काळाचे सावट असल्याने या कार्यक्रमाला सामाजिक आणि भावनिक किनार लाभली रावण दहनानंतर ग्रामस्थांनी आई जगदंबेच्या चरणी नतमस्तक होत राज्यातील ग्रामीण भागात पाऊस पडावा दुष्काळाचे संकट दूर व्हावे आणि संकटात सापडलेल्या बळीराजाला दिलासा मिळावा यासाठी प्रार्थना केली वाईट प्रवृत्तींच्या रावणासोबतच दुष्काळरूपी संकटाचाही अंत व्हावा अशी आर्त साद यावेळी ग्रामस्थांनी घातली
पिंपरी दुमाला येथे सोमेश्वर सार्वजनिक नवरात्र उत्सवाच्या वतीने भव्य नवरात्रोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.

या दहा दिवसांच्या उत्सवात विविध धार्मिक कार्यक्रमांसह सामाजिक संदेश देणारे उपक्रम मनोरंजनाचे कार्यक्रम आणि नागरिकांना सकारात्मक दिशा देणाऱ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते त्यामुळे या उत्सवाला धार्मिकतेसोबतच सामाजिक प्रबोधनाचीही जोड मिळाली असून
विजयादशमीच्या दिवशी रावण दहन करून वाईट प्रवृत्तींच्या अंताचा संदेश देण्यात आला यावेळी गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने एकत्र आले होते मात्र पावसाअभावी शेती आणि शेतकरी अडचणीत असल्याने यंदाच्या विजयादशमीला दुष्काळाच्या संकटाची जाणीव प्रकर्षाने दिसून आली आहे.

शिवार हिरवेगार व्हावे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर पुन्हा आनंद फुलावा
पावसाअभावी ग्रामीण भागातील शेतीसमोर निर्माण झालेल्या संकटाच्या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी आई जगदंबेकडे पावसासाठी साकडे घातले शेतकऱ्यांच्या कष्टाला यश मिळावे शिवार पुन्हा हिरवेगार व्हावे जनावरांच्या चाऱ्याचा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटावा तसेच ग्रामीण भागात सुख-समृद्धी नांदावी अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
एकीकडे विजयादशमीचा उत्साह तर दुसरीकडे दुष्काळाच्या संकटातून मुक्त होण्याची आस अशा भावनिक वातावरणात पिंपरी दुमाला येथे दसरा साजरा करण्यात आला दुष्काळरूपी रावणाचा अंत होऊन बळीराजाच्या जीवनात सुखाचे दिवस यावेत हीच यंदाच्या विजयादशमीला पिंपरी दुमाला ग्रामस्थांनी आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना केली आहे .







