Wednesday, October 21, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

खडकवासला प्रकल्पातून यंदा उन्हाळी आवर्तन नाही; पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांसमोर सिंचनाचे संकट

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Wednesday, 21 October 2026, 23:19

पुणे : पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी चिंताजनक बातमी समोर आली आहे. दुष्काळी परिस्थिती आणि धरणांमधील उपलब्ध पाणीसाठा लक्षात घेऊन खडकवासला धरण साखळी प्रकल्पातून यंदा उन्हाळी आवर्तन न देण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. धरणांमधील पाणी केवळ पिण्यासाठी राखीव ठेवण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी स्पष्ट केले आहे. या निर्णयामुळे उन्हाळी आवर्तनावर अवलंबून असलेल्या सुमारे अडीच लाख हेक्टर शेतीच्या सिंचनाचा प्रश्न निर्माण झाला आहे.

खडकवासला प्रकल्पातील चारही धरणांमधील पाण्यावर पुणे शहरासह पुरंदर, दौंड, बारामती आणि इंदापूर तालुक्यांतील नागरिक अवलंबून आहेत. या भागातील पिण्याच्या पाण्याची गरज भागवण्यासाठी धरणांमधील पाण्याचे नियोजन केले जाते. मात्र, यंदाच्या दुष्काळी परिस्थितीमुळे उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करणे आवश्यक झाले आहे. त्यामुळे प्रशासनाने पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला आहे.

विशेष म्हणजे यंदाच्या पावसाळ्यात खडकवासला प्रकल्पातील चारही धरणे पूर्ण क्षमतेने भरली होती. पाणलोट क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे मुठा नदीतून तब्बल १९ टीएमसी पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता. तसेच रब्बी हंगामातील आवर्तन सुरू होण्यापूर्वी कालव्यातून ६.३८ टीएमसी पाणी सोडण्यात आले होते.

पुरंदर, दौंड, बारामती आणि इंदापूर तालुक्यांमध्ये पावसाचे प्रमाण कमी असल्याने या पाण्याचा खरीप हंगामातील पिकांना फायदा झाला होता. मात्र, आता उन्हाळी आवर्तन बंद राहणार असल्याने पुढील हंगामातील पिकांसाठी पाणी कुठून आणायचे, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे.

 

उन्हाळ्यात पिकांना मोठ्या प्रमाणात पाण्याची गरज असते. कालव्यातून पाणी मिळणार नसल्याने शेतकऱ्यांना विहिरी आणि बोअरवेलवर अवलंबून राहावे लागू शकते. मात्र, भूजल पातळी कमी झाल्यास या पर्यायांवरही मर्यादा येण्याची शक्यता आहे.

पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरळीत ठेवणे आवश्यक असले, तरी सिंचनासाठी पाणी न मिळाल्यास शेती उत्पादनावर परिणाम होण्याची भीती आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी प्रशासन कोणत्या पर्यायी उपाययोजना करणार, याकडे पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

खडकवासला प्रकल्पातून यंदा उन्हाळी आवर्तन नाही; पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांसमोर सिंचनाचे संकट

Wednesday, 21 October 2026, 23:19

यंदा किती दिवस असणार दिवाळीच्या सुट्ट्या? दिवाळी सुट्ट्यांबाबत शिक्षण विभागाकडून परिपत्रक जारी; जाणून घ्या सविस्तर…

Wednesday, 21 October 2026, 22:56

लाडक्या बहिणींनो देवभाऊ तुमच्यासाठी घेऊन येणार आणखी एक योजना! कोण-कोण घेऊ शकणार लाभ? जाणून घ्या सविस्तर

Wednesday, 21 October 2026, 20:33

मध्य रेल्वेचा मोठा निर्णय! स्थानकांवरील किराणा स्टॉलवर चहा, कॉफी आणि शिजवलेल्या पदार्थांच्या विक्रीवर बंदी

Wednesday, 21 October 2026, 20:26

पुण्यात स्पा सेंटरच्या नावाखाली काळे धंदे! सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; कोंढवा-येवलेवाडीत पोलिसांच्या धाडसी कारवाईत २ महिलांची सुटका

Wednesday, 21 October 2026, 20:23

वर्दीमागचा त्याग; हुतात्म्यांना सलाम! २१ ऑक्टोबर पोलीस हुतात्मा दिन; कर्तव्य बजावताना सर्वोच्च बलिदान देणाऱ्या जवानांच्या शौर्याचे स्मरण

Wednesday, 21 October 2026, 19:45
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp