पुणे : आज म्हणजेच 15 नोव्हेंबर 2026 रोजी रविवार आहे. हा वार पूर्णपणे सूर्यदेवांना समर्पित मानला जातो. पंचांगानुसार आज ग्रहांची विशेष स्थिती जुळून येत असून, याचा सर्व 12 राशींच्या लोकांवर वेगवेगळ्या स्वरूपात प्रभाव पडणार आहे. सूर्यदेवांच्या कृपेने आजचा दिवस कोणासाठी फायदेशीर ठरणार आणि कोणाला काळजी घ्यावी लागणार, जाणून घेऊया संपूर्ण राशीभविष्य.

1. मेष : या राशीच्या मंडळींनी आरोग्याची विशेष काळजी घ्यावी. जुने आजार पुन्हा त्रासदायक ठरू शकतात, त्यामुळे औषधोपचार आणि पथ्य पाळण्यात अजिबात कुचराई करू नका.
2. वृषभ : या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस ऊर्जावान असेल. तुम्ही अत्यंत महत्त्वाकांक्षी राहाल आणि प्रतिकूल परिस्थितीवर सहज मात कराल.

3. मिथुन- राशीच्या जातकांनी विनाकारण कसलीही चिंता करणे टाळावे. विशेषतः नोकरी करणाऱ्यांनी आपल्या कर्तव्यात कोणतीही कसूर ठेवू नये.

4. कर्क : राशीच्या लोकांना दुसऱ्यांच्या सांगण्यानुसार चालणे महागात पडू शकते. स्वभावातील चंचलपणामुळे काही प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे.
5.सिंह : राशीच्या महिलांनी घरातील कुटुंबातील सदस्यांसोबत गोड बोलून सलोखा राखण्याचा प्रयत्न करावा. तसेच नोकरी किंवा व्यवसायात थोडे धाडस दाखवणे फायद्याचे ठरेल.
6.कन्या : या राशीच्या व्यक्तींची आर्थिक स्थिती सुधारणार असून मान-सन्मान वाढेल. विशेषतः ज्या लोकांचा व्यवसाय बोलण्याशी संबंधित आहे, त्यांना उत्तम आर्थिक संधी उपलब्ध होतील.
7. तूळ : राशीच्या जातकांना आपल्या मुलांच्या प्रकृतीकडे लक्ष द्यावे लागेल. विद्यार्थ्यांनी हातातले सोडून पळत्याच्या मागे लागण्याचे टाळावे.
8. वृश्चिक : राशीच्या लोकांचे मन धार्मिक उपासना आणि अध्यात्मात रममाण होईल. घरातील ज्येष्ठांनी आपल्या आरोग्याची आणि आहाराची काळजी घेणे गरजेचे आहे.
9. धनु : राशीची मंडळी आज घराची सजावट किंवा काही कलात्मक बदल करण्यात व्यस्त राहतील. यासाठी तुम्ही मोठा खर्च करण्याची तयारीही दर्शवाल.
10.: मकर राशीच्या लोकांच्या स्वभावातील कणखरपणा व्यवहारात अत्यंत उपयोगी ठरेल. आज तुम्हाला भाग्याची पूर्ण साथ मिळणार असून तुमची कल्पनाशक्ती उत्तम काम करण्यासाठी प्रेरणा देईल.
11. कुंभ : राशीच्या जातकांनी इतरांवर खोचक टीका करणे आणि उणिवा शोधणे टाळावे. तुमचा अति स्पष्टवक्ता स्वभाव तुम्हाला अडचणीत आणू शकतो.
12. मीन : राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस नोकरी-व्यवसायात उत्तम वैचारिक स्पष्टता घेऊन आला आहे. विचारांमधील शुद्धतेमुळे तुम्हाला दूरगामी फायदे मिळतील आणि दिवसभरात काही स्फूर्तीदायक घटना घडतील.






