Nashik News : नाशिक: आई आपल्या बाळासाठी जीवाची परवा करत नाही. ती आपल्या बाळासाठी काहीही करु शकते. बाळासाठी आईने गड सर केल्याची नोंद आहे. त्या मातेला आपण हिरकणी म्हणून ओळखतो. अशी एका आधुनिक हिरकणीची कहाणी सध्या चर्चे आहेत. (Modern diamonds! The story of a mother in Nashik who climbed the pipe of a building for her one and a half month old baby…)
नाशिकच्या पेठरोड भागातील अष्टविनायक नगर येथील घटना
नाशिकमधील तृप्ती जगदाळे या महिलेने स्वतःच्या जीवाची पर्वा न करता बाळासाठी पाईपवरुन चौथ्या मजल्यावर पोहोचल्याची घटना घडली आहे. (Nashik News) 22 मे रोजी तृप्ती या कचरा टाकण्यासाठी घराच्या मुख्य दरवाजातून गॅलरीत गेल्या होत्या. यावेळी त्यांचे दीड महिन्याचे बाळ ‘मल्हार’ घरातच झोपले होते. मात्र अचानक मागच्या दरवाजातून हवा आल्याने मुख्य दरवाजा बंद झाला, त्यावेळी तृप्ती या घराच्या बाहेर होत्या. पण बाळ घरात एकटेच होते. त्यामुळे त्यांना चिंता वाटू लागली.
नाशिकच्या पेठरोड भागातील अष्टविनायक नगर येथील एका सोसायटीत ही घटना घडली आहे. बाळाची आई आणि बाळ दोघेचं घरात होते. (Nashik News) हवेमुळे अचानक दरवाजा बंद झाला. त्यानंतर त्यांनी शेजारच्या घरातून मागच्या गॅलरीत जाऊन तिथून पाईपच्या साहाय्याने चढून स्वतःच्या घरात प्रवेश केला. सध्या त्यांच्या या धाडसाची सर्वत्र चर्चा होत आहे.
तृप्ती जगदाळे सोनार यांनी त्यांच्या बाळाला २२ मे रोजी झोळीत झोपवलं होतं. त्या घरातील कामं करत होत्या. घरात स्वच्छता केल्यानंतर त्या कचरा गॅलरीतील टाकण्यासाठी गेल्या आणि नेमक्या त्याचवेळी हवेच्या दाबामुळं गॅलरीचा दरवाजा बंद झाला आणि तृप्ती ताई गॅलरीत अडकून पडल्या. (Nashik News) गॅलरीत अडकल्यानं बाळापर्यंत कसं पोहोचायचं असा प्रश्न त्यांच्या समोर होता.
तृप्ती जगदाळे सोनार यांच्या पुढं घरात कसं पोहोचायचं असा प्रश्न होता. कारण, दीड महिन्याचं बाळ घरात झोळीत झोपवलेलं होतं. त्याच्यापर्यंत काहीही करुन पोहोचायचं, असा त्यांचा प्रयत्न होता. पती आणि मुलगी गावाकडे साखरपुडा करण्यासाठी गेलेले असल्यानं ते लवकर परत येणे अशक्य होतं. त्यामुळं तृप्ती यांनी गॅलरीला असलेल्या भिंतीचा आधार ग्रीलच्या सहाय्यानं घेत बाळापर्यंत पोहोचण्यासाठी जे करायला लागेल ते करायचं असं ठरवलं.(Nashik News) ग्रीलच्या बाजूनं असलेल्या पाइपचा आधार घेत तिसऱ्या मजल्याच्या त्या तिसऱ्या मजल्याच्या पायऱ्यांवर उतरल्या. तिथून पायऱ्यांवरुन चौथ्या मजल्यावर जात घराच्या मागच्या दारानं त्या खोलीत पोहोचल्या आणि बाळाला पोटाशी लावलं. त्यानंतर घराचा मुख्य दरवाजा उघडला.
तृप्ती यांच्या घरातील सर्व बाहेर गावी गेल्याने त्यांना यायला उशीर होणार होता. तसेच मोबाइल देखील घरातच असल्याने कोणाशी संपर्क साधता येत नव्हता.(Nashik News) त्यांच्या पुढे अनेक अडचणी निर्माण झाल्या होत्या.मात्र बाळ रडत असल्याने त्यांनी केवळ बाळाचा विचार करत पाईपवरून घराकडे धाव घेतली.
त्यानंतर त्या घरच्या मागच्या दारानं त्या खोलीत पोहोचल्या आणि बाळाला घेतले. त्यांना कोणत्याही परिस्थितीत बाळापर्यंत पोहायचे होते. (Nashik News) म्हणून त्यांनी हे मोठे धाडस केले. या घटनेनंतर तृप्ती यांचे राज्यभरातून कौतुक केले जात आहे. या मातेचे हे धाडस ऐकल्यानंतर इतिहासात वाचलेल्या हिरकणीची गोष्ट नक्कीच आठवते.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Nashik News : प्रसिद्ध अभिनेते नितेश पांडे यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन
Nashik Crime : नाशिक येथील जिल्हा हिवताप अधिकारी महिलेस लाच घेताना रंगेहाथ पकडले