नागपूर : नागपूरच्या जिल्हा बँक घोटाळा प्रकरणात सुनील केदार यांना न्यायालयाने धक्का दिला. न्यायालयाने त्यांना दोषी ठरवत ५ वर्षांच्या कारावासह १२.५० लाख रुपयांचा दंड अशी शिक्षा ठोठावली आहे. त्यानंतर रविवारी त्यांची आमदारकीदेखील रद्द केली. शिक्षा सुनावली गेल्यानंतर लगेच रुग्णालयात दाखल होणं संशयास्पद आहे. पुण्यातील ससून रुग्णालयात ज्या पद्धतीने ललित पाटीलला तिथल्या अधिष्ठातांनी कारण नसताना दाखल करून घेतले तसाच हा प्रकार असल्याचा आरोप भाजप नेते आशिष देशमुख यांनी केला आहे. एवढेच नाही तर या प्रकरणाची वैद्यकीय शिक्षण विभागाने चौकशी करावी अशी मागणी ही त्यांनी केली आहे.
22 तारखेला न्यायालयाने शिक्षा सुनावली त्या दिवशी रात्री अकरा वाजेपर्यंत सुनील केदार यांचे आरोग्य चांगले होते. मात्र त्यानंतर अवघ्या काही मिनिटांनी त्यांची तब्येत बिघडली. त्यांच्या सर्व चाचण्या योग्य असल्याचे सांगत या प्रकाराची चौकशी वैद्यकीय शिक्षण विभागाने करावी. ” ज्या प्रकरणात शेतकऱ्यांना 22 वर्षानंतर न्याय मिळाला त्या प्रकरणात शिक्षा झालेल्या व्यक्तीला अशा पद्धतीने रुग्णालयात दाखल करून घेऊन तुरुंगवासापासून थांबवणे योग्य नसल्याचे मत आशिष देशमुख यांनी व्यक्त केले आहे. सुनील केदार यांची वृत्ती नेहमीच कायद्याच्या विरोधात राहिली आहे. त्याची पुनरावृत्ती या प्रकरणात होत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.” असे सुनील केदार म्हणाले आहेत.
सुनील केदार यांना रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आलं. मायग्रेनमुळे सुनिल केदार यांना ऑक्सिजनवर ठेवण्यात आले आहे. मायग्रेनमुळे त्यांनी तीव्र डोकेदुखी, छातीत दुखत असल्याची तक्रार केली. तेव्हा रात्रीच डॉक्टरांनी ईसीजी, रक्ताच्या चाचण्या केल्या होत्या. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. त्यांना ऑक्सिजनवर ठेवण्यात आले आहे.