Kolhapur News : कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याच्या दिवशी सोशल मीडियावर आक्षेपार्ह स्टेटस ठेवल्याच्या घटनेनंतर कोल्हापुरात मोठा हिंसाचार झाल्याची घटना समोर आली आहे. कोल्हापुरातील मुख्य चौकात दोन गटात राडा झाल्यानंतर आज हिंदुत्ववादी संघटनांनी आज घटनेच्या निषेधार्थ बंद पुकारला आहे. जमावबंदीचे आदेश झुगारून हा मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी हजारो लोक मोर्चात सहभागी झाले होते. हा मोर्चा सुरू असतानाच आंदोलकांना पोलिसांनी पांगवण्याचा प्रयत्न केला. मात्र, हिंदुत्ववादी कार्यकर्ते आक्रमक झाल्याने पोलिसांनी अखेर या मोर्चावर लाठीमार केला. दरम्यान कोल्हापूरातील या घटनेचे देशभर पडसाद उमटत आहेत. (Tension over ‘that’ offensive status in Kolhapur; Stone pelting in the city, strict lockdown; Hindutva organizations aggressive)
आंदोलकांकडून दगडफेक आणि रिक्षाची तोडफोड
पोस्टविरोधात आक्रमक झालेल्या हिंदुत्ववादी आंदोलकांनी छत्रपती शिवाजी चौकात ठिय्या मांडला. तर त्याचवेळी आंदोलकांकडून दगडफेक आणि रिक्षाची तोडफोड करण्यात आल्याची घटना घडली. (Kolhapur News) समाजकंटकांवर कारवाई करण्याची मागणी या संघटनांनी केली आहे.
कोल्हापुरमध्ये निर्माण झालेल्या तणावाच्या परिस्थितीवर गृहखात्याने पोलिसांना कारवाईचे आदेश दिले आहे. (Kolhapur News) तसेच याबाबत चुकीची माहिती पसरविणाऱ्यांवर कारवाई करण्यास सांगितले आहे. दरम्यान कोणावरही अन्याय होता काम नये याकडेही लक्ष देण्याचे आवाहन केले आहे.
हिंदुत्ववादी संघटनांनी आज, बुधवारी (दि. ७) कोल्हापूर शहर बंदची हाक दिल्यानंतर सकाळपासूनच शहरातील सर्व बाजारपेठांमधील दुकाने बंद आहेत.(Kolhapur News) सकाळी दहापासून हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी चौकात गर्दी केली. आक्षेपार्ह स्टेटस ठेवून राष्ट्रपुरुषांच्या बदनामीचे मेसेज व्हायरल करणा-यांवर कडक कारवाईची मागणी केली.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Kolhapur News : पुणे-बंगळूर महामार्गावर आर्टिगाची रोडरोलरला धडक; दोघांचा मृत्यू,चार गंभीर जखमी