प्रा. सागर घरत
karmala News : करमाळा : अनेक वर्षांचा संघर्ष आणि मोठ्या नाट्यमय घडामोडींनंतर अखेर घरतवाडी-कुंभारगाव रस्त्याच्या पहिल्या टप्प्यातील कामासाठी १० लाख रूपये मंजूर झाले आहेत. आज ७५० मीटरच्या पहिल्या टप्प्यातील कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाल्याने, घरतवाडी ग्रामस्थांच्या हक्काच्या संघर्षाला यश आले आहे. ग्रामस्थांनी याबाबत समाधान व्यक्त केले.
नाट्यमय घडामोडींनंतर ग्रामस्थांच्या संघर्षाला यश
गेल्या अनेक वर्षांपासून घरतवाडी-कुंभारगाव रस्त्याची दुरवस्था झाली होती. राजकीय नेत्यांनी देखील केवळ आश्वासनांची खरापत वाटून, मूळ समस्येकडे कानाडोळा केल्यामुळे, पोकळ आश्वासनांनी ग्रा्मस्थ त्रस्त झाले होते. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे दळणवळणाचा प्रश्न निर्माण झाला होता. (karmala News) अखेर ग्रामस्थांनी ग्रामपंचायत निवडणुकीवर एकमताने बहिष्कार टाकला. या वेळी ‘घरतवाडी विकणे आहे’, असे फलक सोशल मिडियावर व्हायरल केले. यामुळे वर्तमानपत्रांच्या बातम्यांमधून आणि समाजमाध्यमांमधून ग्रामस्थांची नाराजी राज्यभर पोहोचली.
दरम्यान, डांबरी रस्ता होत नाही, तोपर्यंत निवडणुकांवर बहिष्कार कायमच राहील असा ठाम निर्णय ग्रामस्थांनी घेतला. यामुळे लोकप्रतिनिधी, शासन दरबारी हालचालींना वेग येऊन पहिल्या टप्प्यातील ७५० मीटर डांबरी रस्त्याच्या कामाला १० लाख रूपये मंजूर झाले. (karmala News) आज कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली. यामुळे घरतवाडी ग्रामस्थांच्या हक्काच्या संघर्षाला यश आले. उर्वरित काम लवकर मार्गी लागावे तसेच सुरवातीच्या काळात झालेल्या डांबरी रस्त्याची डागडुजी करण्यात यावी, अन्यथा पुढील काळात कठोर भूमिका घेण्यात येईल असा सूर घरतवाडी, युवकवर्ग व ग्रामस्थांमधून उमटत आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Karmala News : मांगी येथे बिबट्याच्या हल्ल्यात वासरू ठार; २० दिवसांत १५ जनावरांचा फडशा
Karmala News : वंजारवाडी येथे वृद्धाचा खून करणाऱ्या अल्पवयीन मुलाला करमाळा पोलिसांनी घेतले ताब्यात..
Karmala News : वंजारवाडीत वृद्धाचा निघृण खून; डोक्यात जबर मारहाण; संशयिताचा तपास सुरु