पुणे : बाजारात आज म्हणजेच गुरुवारीही सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. सोने प्रति 10 ग्रॅम 427 रुपयांनी स्वस्त झाले आहे, तर चांदी 134 रुपयांनी महाग झाली आहे. आतापर्यंतच्या दराच्या तुलनेत, सोने 5,6254 रुपये प्रति 10 ग्रॅमने 5383 रुपयांनी स्वस्त झाले आहे. तर, चांदी दोन वर्षांपूर्वी प्रतिकिलो 76008 रुपयांच्या उच्च दरावरून 19425 रुपयांनी स्वस्त झाली आहे.
आज तुम्हाला 24 कॅरेट शुद्ध सोन्यासाठी 58000 पेक्षा कमी पैसे मोजावे लागतील. 23 कॅरेट सोन्याचे दागिने खरेदीत 10 ग्रॅमसाठी 57400 रुपयांपेक्षा जास्त खर्च करावा लागू शकतो. हाच दर 22 कॅरेट सोन्यासाठी 52795 रुपये तर 18 कॅरेटसाठी 43227 रुपयापेक्षा जास्त पैसे मोजावे लागतील.
इंडिया बुलियन असोसिएशनने जारी केलेल्या स्पॉट रेटनुसार, आज सराफा बाजारात 24 कॅरेट शुद्ध सोने 50871 रुपये प्रति 10 ग्रॅम दराने उघडले. त्याचवेळी चांदी 56583 रुपये प्रति किलो दराने उघडली. 24 कॅरेट सोन्यावर 3 टक्के जीएसटी जोडल्यास त्याचा दर 52397 रुपये होणार आहे, तर ज्वेलर्सचा 10 टक्के नफा जोडल्यानंतर सोन्याची किंमत 57636 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचत आहे. जीएसटी जोडल्यानंतर चांदीचा भाव 58280 रुपये प्रति किलो झाला आहे. यामध्ये ज्वेलर्सचा 10 ते 15 टक्के नफा वेगळा आहे.