(Bus Ticket ) मुंबई : राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये एसटी बसने प्रवास करायचा असेल तर सरसकट हाफ तिकीट देणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे प्रवासामध्ये हाफ तिकीट( Bus Ticket) लागू झाले असल्याचा समज महिलांमध्ये झाला आहे. यावरून एका महिलमध्ये आणि वाहकांमध्ये वाद झाला आहे. ही बस लातूर डेपोतील असल्याची माहिती आहे.
गोविंद मुंडे मारहाण झालेल्या वाहकाचे नाव आहे.
सोशल मिडीयावर व्हायरल व्हिडीओ….!
अर्थसंकल्पामध्ये झालेली घोषणा त्याची होणारी अंमलबजावणी, त्यानंतर शासनाचा अधिकृत निर्णय जाहीर होतो. मात्र महिलांना हाफ तिकीट लागू झाल्याची माहिती गेल्याने लगेच प्रवासामध्ये हाफ तिकीट लागू झाले आहे, असा समज महिलांचा झाला आहे. सोशल माध्यमातून व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक महिला हाफ तिकीट द्या, म्हणून वाहकाला मागणी करत आहे. मात्र वाहक अद्याप या नियमाचे अंमलबजावणी झाली नसल्याचे सांगत आहे.
मात्र महिला हे ऐकत नसून हाफ तिकीटाचा असा आग्रह करत आहे. त्यानंतर वाहकाने हाफ तिकीट मिळणार नाही असे सांगितले असता, जे काय नियमानुसार तिकीट आहे ते द्या. तुम्हाला बघून घेते, कायद्याचा माणूस दाखवे, असा सज्जड दम भरला.
त्याचवेळेस वाहकाने महिलेकडे तुमच्याकडे हाफ तिकीट असल्याचे कोणतेही कार्ड आहे, का अशी विचारणा केली. त्यावर महिलेने हे कार्ड घरी राहिले आहे, असे सांगितले त्यावरून त्या दोघांमध्ये वाद पेटला, असे व्हिडिओमध्ये दिसून येत आहे.
तसेच वाहकाला बेदम मारहाण केल्याचा एक फोटो देखील व्हायरल झाला आहे. त्याच्या गालावर मारहाण केल्याने रक्त येत असल्याचे त्यामध्ये दिसून येत आहे. महिलेने असा वाद घातल्या एसची वाहकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. शासनाने याचा अधिकृत आदेश जाहीर करावा. किंवा एसटी विभागाने अद्याप हाफ तिकीट लागू झाले नसल्याची माहिती प्रसारित करावी, अशी मागणी नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितली.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…!
Pune News : खादी व ग्रामोद्योग मंडळातर्फे दोन दिवसीय प्रशिक्षण सत्राचे आयोजन!
Pune News : वाहतूक नियमन सोडून वसुली करणे पडले चांगलेच महागात ; पोलीस कर्मचारी निलंबित!