Big News : पुणे : ड्रग्स माफिया ललित पाटील याला अटक केल्यानंतर त्याचे काळे कारनामे आणि अनेक राजकारणी, पोलीस, डाॅक्टरांनी त्याला केले सहकार्य या दृष्ट प्रवृत्तीच्या निषेधार्थ ठाकरे गटाने नाशिकमध्ये मोर्चा काढला. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत त्यासाठी आज नाशिकमध्ये आले आहेत. या वेळी पत्रकारांशी बोलताना संजय राऊत यांनी गंभीर आरोप केला आहे. ड्रग्स प्रकरणात आमदारांना किती हप्ता मिळायचा याची माहिती असलेला कागदच त्यांनी वाचून दाखवला. एका आमदाराला १६ लाखांचा हप्ता मिळतो. असे सहा आमदार आहेत. हे रॅकेट साधे-सोपे नाही… असा आरोप करताच एकच खळबळ उडाली आहे. गृहमंत्र्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी राऊत यांनी केली आहे.
सखोल चौकशी करण्याची मागणी
फडणवीस यांना उद्देश्यून राऊत म्हणाले की, आता नेक्सस उघड झाले आहे. फडणवीस सध्या भरकटल्यासारखे बोलत आहेत. त्यांच्या आसपासची माणसे नशेच्या बाजारात फिरत आहेत. नशेबाजांमुळे फडणवीसांची मती गुंग झाली आहे. (Big News ) फडणवीस, तुम्ही गृहमंत्री आहात. एक पिढी बरबाद होताना दिसत आहे आणि तुम्ही राजकारण करता, असा सवाल राऊत यांनी केला. नागपूरमध्ये तुमच्याच कार्यकर्त्यांनी डीसीपीची कॉलर पकडली. गृहमंत्री म्हणून तुम्ही काय करता, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. अनेक चांगले गृहमंत्री या महाराष्ट्राने पाहिले आहेत. कोणी सूडाने कारवाई केली नाही. तुमच्या आजूबाजूला माफिया बसले आहेत, त्यांची बाजू घेऊ नका, असेही त्यांनी सांगितले. गृहमंत्र्यांकडे सर्वांची माहिती असते. मग या ड्रग्ज माफियांची माहिती तुमच्याकडे नाही, हे कसे शक्य आहे? हा ड्रग्ज गुजरातमधून येतो, त्यांची बाजू तुम्ही घेता का? असा सवाल त्यांनी केला.
शैक्षणिक संस्था आणि चालकांनी आमचे अभिनंदन केले आहे. त्यांचे विद्यार्थी मोर्चात येणार आहेत. हा सामाजिक प्रश्न आहे. पण काल एका शिक्षण अधिकाऱ्याने पत्रक काढले आणि विद्यार्थ्यांनी मोर्चात सहभागी होऊ नये असे आदेश दिले. (Big News ) म्हणजे विद्यार्थ्यांनी नशेच्या आहारी जावे का? पानटपऱ्यांवर ड्रग्स मिळते त्याला त्यांचे समर्थन आहे का? असा सवाल त्यांनी केला. कलेक्टरकडे बैठक घेण्यात आल्या. विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांची बैठक झाली. का तर विद्यार्थ्यांना मोर्चात सहभागी करून घेऊ नका म्हणून. ते तुमचं काम नाही. पण त्या बाईंनी नाशिकला येऊन कलेक्टरकडे बैठक घेतली. मोर्चात विद्यार्थ्यांनी सहभागी होऊ नये, असे आदेश दिले. तुम्ही चुकीचे राजकारणात का कराता? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Big News : ललित नव्हे, भूषण पाटील ससूनमधील ड्रग्ज रॅकेटचा खरा सूत्रधार; तपासात धक्कादायक माहिती उघड!