बंगळुरू : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025 स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी महत्त्वाची मालिका न्यूझीलंड आणि भारत यांच्यात होत आहे. या मालिकेतील निकालावर भारताचं अंतिम फेरीचं भवितंव्य गणित ठरणार आहे. कारण पुढे येणारा ऑस्ट्रेलियाविरुद्धचा पाच सामन्याचा पेपर कठीण असणार आहे. त्यामुळे न्यूझीलंडविरुद्ध तीन सामन्यांची मालिका 3-0 ने जिंकून भार हलका करण्याचा मानस भारताचा होता. मात्र पहिल्याच सामन्यात सर्वच उलट झालं आहे. न्यूझीलंडविरुद्ध नाणेफेकीचा कौल जिंकूनही रोहित शर्मा मोठी चूक करून बसला आहे.
नाणेफेक जिंकल्यानंतर रोहित शर्माने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र इथेच सर्व खेळ उलटला. फलंदाज एक एक करत खेळपट्टीवर हजेरी लावून जात होते. एवढंच नाही तर पाच फलंदाजांना आपलं खातंही उघढता आलेलं नाही. रोहित शर्माच्या एका चुकीमुळे टीम इंडियाला फटका बसल्याचं दिसत आहे. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर रोहित शर्माने आपल्या चुकीची जाहीर कबुलीही दिली.
रोहित शर्माने जाहीर कबुली दिली की, खेळपट्टीचा अभ्यास करता आला नाही. त्यामुळे टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिलं सत्र कठीण जाईल असं वाटत होतं. पण तसं झालं नाही. “आम्हाला वाटलं की खेळपट्टीवर जास्त गवत नाही. आम्ही विचार केला की पहिल्या सत्रात जे काही व्हायचं ते होऊ दे. त्यानंतर खेळ जसा पुढे जाईल तसा खेळपट्टीचा अंदाज बदलेल. जेव्हा आम्ही भारतात खेळतो तेव्हा पहिलं सत्र कठीण जातं. त्यानंतर खेळपट्टी फिरकीपटूंना मदत करू लागते.”
“मला वाटलं की खेळपट्टीवर जास्त गवत नव्हतं. त्यामुले वाटलं की कुलदीप यादवला प्लेइंग 11 मध्ये सामिल केलं पाहीजे. कारण कुलदीपने सपाट खेळपट्टीवरही गोलंदाजी केली आहे आणि तो विकेटही घेतो.”, असं कर्णधार रोहित शर्माने सांगितलं.