लोणी काळभोर : एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठ, विश्वराजबाग, लोणी काळभोर (ता. हवेली) यांच्यातर्फे आयोजित पाचव्या विश्वनाथ स्पोर्टस् मीट २०२३ मध्ये आज झालेल्या मुष्टीयुद्धाच्या पुरुषांच्या कमी वजन गटात गरवारे कॉलेजचा आर्या पवार यांनी एमआयटी स्कूल ऑफ इंजीनिअरिंगच्या हरिष होनराव याच्या सुरुवातीपासूनच आक्रमण सामना जिंकला.
फ्लाय गटात पूना कॉलेजचा मोहित सिंग भदोरिया यांने एसएनबीपी कॉलेजच्या रोहित खत्री याला पराभूत करत सुवर्ण पदक जिंकले. बँथम गटात एमआयटी स्कूल ऑफ इंजीनिअरिंगचा शुभम कारळे यांने एमआयटी मॅनेटच्या आर्य निजई याचा पराभव करून सुवर्ण पदक जिंकला. तर मुलींच्या कमी वजन गटात एसपी कॉलेजची राजनंदिनी घोरपडे हिने बाबुराव घोलप कॉलेज सांगवीच्या मोनवी ओव्हळ हिला पराभूत करत सुवर्ण पदक जिंकले. मध्यम वजनी गटात नेस वाडिया कॉलेजची योगिता परदेशी हिने एसपी कॉलेजच्या धनश्री पाटोळे हिचा पराभव करून सुवर्ण पदक जिंकले, तर धनश्रीला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले.
प्लायवेट गटात बिर्ला कॉलेजची स्नेहा दुबे हिने बीएस पटेल शेवगाव कॉलेजच्या अरती खंडागळे हिचा पराभव करत सुवर्ण पदकावर आपले नाव कोरले, तर आरतीला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले.
मुष्टीयुद्धाच्या (पुरुष) सामन्यात ५२ किलो वजनी गटात पूना कॉलेजचा ऋषिकेश गौड, डीवाय पाटील कॉलेजचा दर्शन डाफ, ५७ किलो वजनी गटात बिजेएस वाघोली कॉलेजचा यश गौड, ६० किलो वजनी गटात पुना कॉलेजचा अंकित खोमने, मॉर्डन कॉलेजचा प्रसाद परदेशी, ६४ किलो वजनी गटात टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचा विवेक मंडल, रामकृष्ण मोरे कॉलेजचा केतन गायकवाड, बीजीएस वाघोलीचा कुणाल मोरे तर ९१ किलो वजनी गटात वाघिरे कॉलेजचा स्वप्निल गवळी यांनी आपल्या प्रतिस्पर्धी खेळाडूंचा पराभव करत सुवर्ण पदक जिंकले.
मुष्टीयुद्धाच्या महिला गटात ५२ किलो वजनी गटात पुना कॉलेजची अलिया सय्यद, ४५ किलो वजनी गटात बेडेकर कॉलजेची सायली गायकवाड आणि ५० किलो वजनी गटात खुशी यादव हिने सुवर्ण पदक जिंकले. ५५ किलो वजनी गटात टिळक महाराष्ट्र विद्यापीठाची ऋतुजा काळे, ५७ किलो वजनी गटात लक्ष्मी मेहरा हिने सुवर्ण पदक जिंकले. ६४ किलो वजनी गटात सीस कॉलेजची आर्या हिने एमआयटी एसबीएसआरच्या अलिष्का किरम हिचा पराभव करत सुवर्ण पदक जिंकले.
फुटबॉलमध्ये श्रीमंती मिठीबाई मोतिराम कुंदानी, तर पुरुष प्रकारात संजय घोडावत विद्यापीठ कोल्हापूरला सुवर्ण पदक जिंकले. महिलांच्या फुटबॉल सामन्यात श्रीमंती मिठीबाई मोतिराम कुंदानी संघानी एमआयटी स्कूल ऑफ इंजीनिअरिंग संघाचा पराभव केला. तर संजय घोडावत विद्यापीठ कोल्हापूर संघाने पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजीनिअरिंगचा पराभव करत सुवर्ण पदक जिंकेल.
पुरुष कबड्डीत डीवाय पाटील एसीएस कॉलेज संघाने पोपटराव किशनराव थोरत कॉलेज खुटबव दौड संघाचा पराभव करत सुवर्ण पदक जिंकले. तर महिलांच्या कबड्डीत एमईएस गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्स संघाने शरद कॉलेज ऑफ आर्ट, सायन्स आणि कॉमर्स कात्रज संघाचा पराभव करून सुवर्ण पदकावर आपले नाव कोरले. तसेच क्रिकेट मध्ये नेस वाडिया कॉलेजने बलाढ्य असा मुंबईच्या सिद्धार्थ कॉलेजचा धुवा उडवत सुवर्ण पदकावर आपले नाव कोरले.