Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

लोणी काळभोर येथील विश्वनाथ स्पोर्टस्‌ मीट २०२३ स्पर्धा ! मुष्टीयुद्धात आर्या पवार, मोहित भदोरिया, रोहित खत्री, शुभम कारळे, स्नेहा दुबे, राजनंदिनी घोरपडे, योगिता परदेशी यांनी सुवर्णपदक पटकाविले

विशाल कदमby विशाल कदम
Wednesday, 1 February 2023, 17:04

लोणी काळभोर : एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठ, विश्वराजबाग, लोणी काळभोर (ता. हवेली) यांच्यातर्फे आयोजित पाचव्या विश्वनाथ स्पोर्टस्‌ मीट २०२३ मध्ये आज झालेल्या मुष्टीयुद्धाच्या पुरुषांच्या कमी वजन गटात गरवारे कॉलेजचा आर्या पवार यांनी एमआयटी स्कूल ऑफ इंजीनिअरिंगच्या हरिष होनराव याच्या सुरुवातीपासूनच आक्रमण सामना जिंकला.

फ्लाय गटात पूना कॉलेजचा मोहित सिंग भदोरिया यांने एसएनबीपी कॉलेजच्या रोहित खत्री याला पराभूत करत सुवर्ण पदक जिंकले. बँथम गटात एमआयटी स्कूल ऑफ इंजीनिअरिंगचा शुभम कारळे यांने एमआयटी मॅनेटच्या आर्य निजई याचा पराभव करून सुवर्ण पदक जिंकला. तर मुलींच्या कमी वजन गटात एसपी कॉलेजची राजनंदिनी घोरपडे हिने बाबुराव घोलप कॉलेज सांगवीच्या मोनवी ओव्हळ हिला पराभूत करत सुवर्ण पदक जिंकले. मध्यम वजनी गटात नेस वाडिया कॉलेजची योगिता परदेशी हिने एसपी कॉलेजच्या धनश्री पाटोळे हिचा पराभव करून सुवर्ण पदक जिंकले, तर धनश्रीला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले.

प्लायवेट गटात बिर्ला कॉलेजची स्नेहा दुबे हिने बीएस पटेल शेवगाव कॉलेजच्या अरती खंडागळे हिचा पराभव करत सुवर्ण पदकावर आपले नाव कोरले, तर आरतीला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले.

 

मुष्टीयुद्धाच्या (पुरुष) सामन्यात ५२ किलो वजनी गटात पूना कॉलेजचा ऋषिकेश गौड, डीवाय पाटील कॉलेजचा दर्शन डाफ, ५७ किलो वजनी गटात बिजेएस वाघोली कॉलेजचा यश गौड, ६० किलो वजनी गटात पुना कॉलेजचा अंकित खोमने, मॉर्डन कॉलेजचा प्रसाद परदेशी, ६४ किलो वजनी गटात टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचा विवेक मंडल, रामकृष्ण मोरे कॉलेजचा केतन गायकवाड, बीजीएस वाघोलीचा कुणाल मोरे तर ९१ किलो वजनी गटात वाघिरे कॉलेजचा स्वप्निल गवळी यांनी आपल्या प्रतिस्पर्धी खेळाडूंचा पराभव करत सुवर्ण पदक जिंकले.

मुष्टीयुद्धाच्या महिला गटात ५२ किलो वजनी गटात पुना कॉलेजची अलिया सय्यद, ४५ किलो वजनी गटात बेडेकर कॉलजेची सायली गायकवाड आणि ५० किलो वजनी गटात खुशी यादव हिने सुवर्ण पदक जिंकले. ५५ किलो वजनी गटात टिळक महाराष्ट्र विद्यापीठाची ऋतुजा काळे, ५७ किलो वजनी गटात लक्ष्मी मेहरा हिने सुवर्ण पदक जिंकले. ६४ किलो वजनी गटात सीस कॉलेजची आर्या हिने एमआयटी एसबीएसआरच्या अलिष्का किरम हिचा पराभव करत सुवर्ण पदक जिंकले.

फुटबॉलमध्ये श्रीमंती मिठीबाई मोतिराम कुंदानी, तर पुरुष प्रकारात संजय घोडावत विद्यापीठ कोल्हापूरला सुवर्ण पदक जिंकले. महिलांच्या फुटबॉल सामन्यात श्रीमंती मिठीबाई मोतिराम कुंदानी संघानी एमआयटी स्कूल ऑफ इंजीनिअरिंग संघाचा पराभव केला. तर संजय घोडावत विद्यापीठ कोल्हापूर संघाने पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजीनिअरिंगचा पराभव करत सुवर्ण पदक जिंकेल.

पुरुष कबड्डीत डीवाय पाटील एसीएस कॉलेज संघाने पोपटराव किशनराव थोरत कॉलेज खुटबव दौड संघाचा पराभव करत सुवर्ण पदक जिंकले. तर महिलांच्या कबड्डीत एमईएस गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्स संघाने शरद कॉलेज ऑफ आर्ट, सायन्स आणि कॉमर्स कात्रज संघाचा पराभव करून सुवर्ण पदकावर आपले नाव कोरले. तसेच क्रिकेट मध्ये नेस वाडिया कॉलेजने बलाढ्य असा मुंबईच्या सिद्धार्थ कॉलेजचा धुवा उडवत सुवर्ण पदकावर आपले नाव कोरले.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

पुण्यातल्या कॉलेज तरुणींचा फ्री स्टाईल राडा! एकमेकींचे केस ओढले अन्… पहा व्हायरल Video

Thursday, 2 July 2026, 23:00

शनिवारवाड्याचा ‘हजारी कारंजा’ पुन्हा होणार सुरू! पेशवेकालीन जलव्यवस्थापन पूर्ववत करण्याचा केंद्राचा निर्णय

Thursday, 2 July 2026, 22:38

पुणेकरांची मोठी प्रतीक्षा संपली! मेट्रो आता थेट लोहगाव विमानतळापर्यंत; कल्याणीनगर ते विमानतळ मार्गाला मंजुरी

Thursday, 2 July 2026, 21:59

पुण्यातील घटना! ‘खडकी मे चांदणे गँग राज करेगी’ मैत्रिणीवरून वाद; डायरेक्ट डोक्यात कोयता घातला अन्…

Thursday, 2 July 2026, 21:07
Next Post

कोडीत खुर्द येथे "विशेष श्रमसंस्कार शिबीर" संपन्न...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.