Thursday, October 8, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुणेकरांची मोठी प्रतीक्षा संपली! मेट्रो आता थेट लोहगाव विमानतळापर्यंत; कल्याणीनगर ते विमानतळ मार्गाला मंजुरी

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Thursday, 2 July 2026, 21:59

पुणे: पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. लोहगाव विमानतळापर्यंत थेट मेट्रो सेवा उपलब्ध करून देण्यासाठी कल्याणीनगर मेट्रो स्थानकापासून विमानतळापर्यंत नवीन मेट्रो मार्ग उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्रीय हवाई वाहतूक राज्यमंत्री आणि पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला.

महा मेट्रोने या मार्गाची व्यवहार्यता तपासल्यानंतर त्याला मंजुरी देण्यात आली आहे. सध्या पुणे विमानतळाला थेट मेट्रोची सुविधा नसल्यामुळे प्रवाशांना येरवडा किंवा इतर मेट्रो स्थानकांवर उतरून पुढील प्रवास टॅक्सी किंवा अन्य वाहनांनी करावा लागतो. त्यामुळे वेळ आणि खर्च दोन्ही वाढतात. नवीन मार्गामुळे ही अडचण दूर होण्याची अपेक्षा आहे.

सध्या पुणे मेट्रोची लाइन 1 (पीसीएमसी ते स्वारगेट) आणि लाइन 2 (वनाझ ते रामवाडी) या दोन मार्गांवर सेवा सुरू आहे. कल्याणीनगर स्थानक हे लाइन 2 वर असून सिव्हिल कोर्ट स्थानकावर लाइन 1 आणि लाइन 2 यांच्यात इंटरचेंजची सुविधा आहे. त्यामुळे शहराच्या विविध भागांतील प्रवाशांना विमानतळापर्यंत सहज पोहोचता येणार आहे.

याशिवाय, प्रस्तावित लाइन 3 (हिंजवडी ते शिवाजीनगर) आणि लाइन 4 (खडकवासला ते खराडी) या मार्गांनाही कल्याणीनगर स्थानकाशी जोडण्याची योजना आहे. त्यामुळे भविष्यात पुण्यातील चारही मेट्रो मार्गांवरून लोहगाव विमानतळापर्यंत थेट आणि सुलभ प्रवास शक्य होणार आहे.

 

दरम्यान, बैठकीत वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी पौड फाटा ते वनदेवी मंदिर आणि कचरा डेपोपासून चांदणी चौक मेट्रो स्थानकापर्यंत डबल डेकर उड्डाणपूल उभारण्याचे निर्देशही देण्यात आले. तसेच शेवळेवाडी-हडपसर-कात्रज मेट्रो मार्गाचा चांदणी चौक-वाकडपर्यंत विस्तार करण्यासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

 

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

शिरूरमध्ये जुगार अड्ड्यावर छापा, 12 हजार 550 रुपयांचा मुद्देमाल जप्त; 4 जणांवर गुन्हा दाखल

Thursday, 8 October 2026, 17:04

डाळिंबमधून बेपत्ता तरुणाचा विहिरीत आढळला मृतदेह; पाठीला 16 किलोचा दगड बांधल्याने खुनाचा संशय

Thursday, 8 October 2026, 17:00

लोणावळ्यात अभय मराठे यांच्या मृत्युप्रकरणात मोठे वळण; आधी ‘अपघाती गोळीबार’, नंतर खून उघडकीस, मृताचे आजोबा अटकेत, त्यानंतर दोन पोलीस अधिकाऱ्यांची तडकाफडकी बदली का?

Thursday, 8 October 2026, 16:45

1200 एकर सरकारी जमिनीचा वाद पेटला; सुप्रिया सुळे म्हणाल्या, “माझा जावई यात…”

Thursday, 8 October 2026, 16:16

व्यवस्था-बदलाची गरज की व्यक्ती-बदलाची? ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीच्या पलीकडे निवडणूक आयोगाच्या विश्वासार्हतेची खरी कसोटी

Thursday, 8 October 2026, 15:45

पगार ९० हजार पण फिरतात मर्सिडीज मधून! सचिन वाझेंची संपत्ती अन् आलिशान गाड्यांवरून कोर्टानं झापलं; ३ तास कोर्टात हायव्होल्टेज सुनावणी

Thursday, 8 October 2026, 15:41
Next Post

Den pålitelige leverandøren av online spill for Norge er Jet4Bet Casino

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp